SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, September 13, 2022

निबंध ~ राष्ट्रपिता महात्मा गांधी

⚜️ राष्ट्रपिता महात्मा गांधी ⚜️



ज्यांनी जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याची शिकवण दिली, ज्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक आणि शांततामय मार्गांनी लढा दिला, ज्याने हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि त्यांच्यातील तंटे मिटवण्यासाठी उपोषणे  केली, त्या महान पुरुषाचा म्हणजे महात्माजींचा जन्म भारतात झाला ही गोष्ट भारताला अभिमानास्पद आहे.

महात्मा गांधींचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई होते. लहानपणी सारेच त्यांना आवडीने मोहनिया म्हणायचे, लहानपणापासूनच ते सत्यनिष्ठ होते.

गांधीजी हायस्कूलमध्ये असताना शाळेची तपासणी घेण्यासाठी अधिकारी आले. त्यांनी मुलांना पाच शब्द लिहिणे लिहायला सांगितले होते. त्यात Kettle हा शब्द होता. तो लिहिताना गांधीजी चुकले होते. हे त्यांच्या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गांधीजींना शेजारच्या मुलांचे बघून लिहिण्यास सांगितले, पण गांधीजींनी तसे केले नाही. त्यांनी दुसऱ्यांची कॉपी केली नाही. गांधीजी लहानपणी सामान्य मुलांप्रमाणेच होते. वर्गात ढ म्हणून त्यांना चिडवायचे. शाळा सुटल्यावर रस्त्यातून जाताना सुद्धा ती भीतभीतच घरी जायचे.

वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचे कस्तुरबांशी लग्न झाले. 1987 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी विलायतेला गेले. ते बॅरिस्टर होऊनच भारतात परत आले. पुढे ते आफ्रिकेत गेले. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढा दिला. सत्याग्रह करून हिंदी लोकांना न्याय हक्क व सवलती मिळवून दिल्या.

1920 साली टिळकांचे निधन झाले आणि गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. 1921 साली त्यांनी पहिला सत्याग्रह केला. 1930 साली असहकार व सविनय कायदेभंग चळवळ हातात घेतली. 1942 साली त्यांनी इंग्रजांविरुद्ध 'चले जाव' ची घोषणा दिली. असत्य, अन्याय व पारतंत्र्य यांच्याविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य समर्पित केले. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

स्वातंत्र्य मिळाल्यांवर 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली येथे एका माथेफिरू माणसाने गांधीजींची हत्या केली.

 ते एक श्रेष्ठ महामानव होते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा गांधी यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टच करा.

👇


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवण्यासाठी खाली टच करा.
👇




No comments:

Post a Comment