⚜️ मूठभर धान्य! ⚜️
ही गोष्ट गौतम बुद्धाच्या काळातील आहे. एक महिला आपल्या मृत बालकाला घेऊन गौतम बुद्धांकडे आली आणि पायावर डोके ठेवून म्हणाली, "भगवान काहीही करा पण माझ्या मुलाला जिवंत करा. एकादा मंत्र म्हणा म्हणजे माझा मुलगा जिवंत होईल".
गौतम बुद्धांना तिची खूप दया आली. तिला शांत करून गौतम बुद्ध म्हणाले, "तू शोक करू नकोस, मी तुझ्या मुलाला नक्कीच जिवंत करीन". त्या महिलेला आनंद झाला गौतम बुद्ध पुढे म्हणाले, "ज्या घरात आजपर्यंत एकही माणूस मेला नाही अशा घरातून प्रथम मूठभर धान्य घेऊन ये. मग मी तुझा मुलगा जिवंत करतो."
त्या महिलेला विश्वास वाटला व मूठभर धान्य आणण्यासाठी ती निघून गेलीः पण ज्या घरात यापूर्वी एकही माणूस मृत्यू पावला नाही असे घर तिला सापडलेच नाही. व मूठभर धान्य मिळाले नाही. ती महिला निराश झाली व गौतम बुद्धांकडे परत आली. म्हणाली "गुरुदेव जेथे एकही मृत्यू झाला नाही असे एकही घर जगात नाही."
मग गौतम बुद्ध म्हणाले, "आता तुझ्या लक्षात आलेन असेल की तुझ्या एकटीवरच हे संकट आलेली नाही. जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी मृत्यू हा येणारच. अशा वेळी धैर्याने दुःख सहन केले पाहिजे".
त्या महिले ही गोष्ट पटली. प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. ती महिला शांत होऊन परत गेली.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर बोधकथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
👇
No comments:
Post a Comment