SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, September 3, 2022

माझी आई

⚜️ माझी आई ⚜️



माझ्या आईचे नाव सुप्रिया आहे. ती मला खूप खूप आवडते. ती माझी खूप काळजी घेते. मी काय करते काय नाही यावर तिचे बारीक लक्ष असते. पण त्याचवेळी ती मला नवीन नवीन गोष्टी करायलाही देते. तिचा मला खूप आधार वाटतो. रात्री झोपताना ती माझ्या बाजूला असली की मला गाड झोप लागते.

माझी आई घरचे सर्व काम करते. त्यामुळे तिला खूप वेळ नसतो. तरीही ती माझ्यासाठी रोज संध्याकाळी थोडा वेळ काढतेच. तेव्हा आम्ही खूप बोलतो व खेळतोही.

 मी चुकीचा वागलो की ती मला रागावतेसुद्धा. पण नंतर प्रेमाने जवळही घेते. मी आजारी पडलो की माझ्या बाजूला बसून राहते. तिला वेळ मिळेल तेव्हा ती माझ्यासाठी छान छान पदार्थ करते.

माझी आई माझा अभ्यास घेते. खरे तर तिला घरामध्ये खूप काम असते. तरीही ती मला वेळ काढून चांगले शिकू शकते.

सुट्टीच्या दिवशी मला आई बरोबर राहण्यास खूप वेळ मिळतो. परंतु आई काम करत करतच माझ्याकडे लक्ष ठेवते. तसेच मला वेळही देत अनेक नवनवीन गोष्टी शिकवते.

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

माझी आई मला खूप आवडते. " स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी " म्हणतात ते काही खोटे नाही.

No comments:

Post a Comment