SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Sunday, September 18, 2022

विभाज्यतेच्या कसोट्या

 विभाज्यतेच्या कसोट्या



⚜️ 2 ची कसोटी

नियम 👉 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 , 2 , 4 , 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असल्यास त्या पूर्ण संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण 

           3452  या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे. म्हणून या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 3 ची कसोटी

नियम 👉 कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन ने निशेष भाग जातो.

उदाहरण

            3456 या संख्येमधील अंकांची बेरीज केली असता 3 + 4 + 5 + 6 = 18 येते व या 18 ला तीन ने निशेष भाग जातो म्हणून 3456 या पूर्ण संख्येला तीन ने निशेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 4 ची कसोटी

नियम 👉 एखाद्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असल्यास त्या पूर्ण संख्येला 4 नि:शेष भाग जातो.

उदाहरण

           5224 या संख्येमध्ये शेवटचे दोन अंक 24 आहेत व या 24 ला 4 ने नि:शेष भाग जातो, म्हणून 5224 या पूर्ण संख्येला 4 ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 5 ची कसोटी

नियम 👉 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते अशा संख्येला 5 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण

5630 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून 5630 या पूर्ण संख्येला पाच ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 6 ची कसोटी

नियम👉 जर एखाद्या संख्येला 2 ने व 3 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण

           4842 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे म्हणून 4842 या पूर्ण संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो. तसेच 4842 या संख्येमधील अंकांच्या बेरजेला (4 + 8 + 4 + 2 = 18) 3 ने नि:शेष भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने नि:शेष भाग जातो.

म्हणूनच ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने नि:शेष भाग जातो. म्हणून 4842 या पूर्ण संख्येला 6 ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 7 ची कसोटी

नियम 👉 एखाद्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ही उरलेल्या संख्येमधून वजा केली असता येणारी वजाबाकीला जर सात ने भाग जात असेल तर त्या संख्येला 7 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण

847 या संख्येच्या एकक स्थानी सात आहे आणि याची दुप्पट 14 होते. ही दुप्पट उरलेल्या संख्येमधून म्हणजेच 84 मधून वजा केली. असता( 84 - 14 = 70 ) वजाबाकी 70 येते आणि या 70 ला 7 ने निशेष भाग जातो. म्हणून 847 या पूर्ण संख्येला 7 ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 8 ची कसोटी

नियम 👉 संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस आठ ने भाग गेल्यास अथवा संख्येच्या शेवटी कमीत कमी तीन शून्य असल्यास त्या पूर्ण संख्येला आठ ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण

7408 या संख्येच्या शेवटचे तीन अंक 408 आहे. आणि या 408 ला 8 ने नि:शेष भाग जातो म्हणून 7408 या पूर्ण संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 9 ची कसोटी

   नियम👉 दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर नऊ ने नि:शेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊ ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण

           6345 या संख्येमधील अंकांची बेरीज केली असता.( 6 + 3 + 4 + 5 = 18 ) ती बेरीज 18 येते. आणि या 18 ला 9 ने नि:शेष भाग जातो. म्हणून 6345 या पूर्ण संख्येला नऊ ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ 10 ची कसोटी

नियम 👉 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 शून्य असते त्या पूर्ण संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरण

8290 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून या पूर्ण संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर विभाज्यतेच्या कसोट्या हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.

👇


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या या घटकावरील सराव चाचणी सोडवायची असेल तर खाली टच करा.

👇



No comments:

Post a Comment