SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, September 23, 2022

बोधकथा ~ निरीक्षण

⚜️ निरीक्षण ⚜️



      एकदा एका वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्मण निरीक्षण शक्ती व किळस सोसण्याची क्षमता पाण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हटले ,'या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे तिरस्कार दर्शवायचा नाही'.

          सरांनी वाटीत बोट बुडवून चाखले. पाठवपाठ एकामागून एका विद्यार्थ्याने ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.

         प्राध्यापक म्हणाले ,'किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळे पास झालात पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात'.

         'मी करतो तसे तुम्ही करायचे होते तुमच्या कुणाच्या लक्षात आली नाही मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच'.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसवले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले. म्हणाले या पाण्यात अपायकारक काहीच नाही. आता विद्यार्थी खुश झाले.

तात्पर्य

प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पटते व त्यातून यशाचा मार्ग खुला होतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा

👇


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

No comments:

Post a Comment