SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, September 8, 2022

निबंध दसरा

⚜️ दसरा ⚜️



           दसरा हा सण हिंदूंच्या दृष्टीने खूप मोठा सण आहे. या सणाला 'विजयादशमी' असे सुद्धा म्हणतात. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाचे पहिले नऊ दिवस नवरात्री असते. दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. वाईट प्रवृत्तीच्या रावणाचा या दिवशी वध केला जातो. जेवायला काहीतरी गोड पकवान केले जाते. लोक आनंदाने एकमेकांना भेटतात. शाळेला आणि सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असते.

           याच दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले. त्यांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे खाली काढली. म्हणून ह्या दिवशी शमीची किंवा आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे.

             तसेच ह्या शुभ्र दिवशी लढाईसाठी आपल्या राज्याच्या सीमे बाहेर पडण्याची प्रथा होती. म्हणून ह्या दिवसाला सिमोल्लंघनाचा किंवा शिलंगणाचा दिवस असे नाव आहे.

आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. चार महिने पावसाळा झाल्यामुळे अश्विन महिन्यात धान्य घरात येते, शेतकऱ्याला कामातून विश्रांती मिळते. म्हणून तो दसरा आणि दिवाळी सारखे सण साजरे करतो. अन्नधान्य चांगले पिकल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. म्हणून तर म्हटले आहे...

 दसरा सण मोठा..... नाही आनंदाला तोटा....

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

No comments:

Post a Comment