🐪 उंटाची सावली 🐪
एका वाळवंटात एक गोविंद नावाचा माणूस राहत होता. त्याच्याकडे एक उंट होता. तो उंटावरून प्रवाशांना घेऊन जात असे. एकदा एक प्रवासी त्याच्या उंटावर बसला. थोड्यावेळाने ऊन कडाडू लागले. सगळीकडे वाळवंट होते. दोघेही खूप दमले.
वाटेत विश्रांतीसाठी जरा थांबवावे असा गोविंद ने विचार केला. प्रवासी उंटावरून खाली उतरला व उंटाच्या सावलीला बसला. गोविंदने हे पाहिले त्याला राग आला तो प्रवाशाला म्हणाला "उंट माझा आहे. म्हणून त्याची सावली सुद्धा माझी आहे. मी सावलीत बसणार"
प्रवासी म्हणाला "मी भाडे दिली आहे. म्हणून सावली माझ्या मालकीचीचना म्हणून मी सावलीत बसणार" दोघेही खूप वेळ भांडत बसले. तेवढ्यात उंट पळून गेला. दोघांनाही वाळवंटात चालत जावे लागले.
तात्पर्य
मूर्खासारखे भांडत राहिल्याने दोघांचेही नुकसान होते
🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪
No comments:
Post a Comment