SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label निबंध. Show all posts
Showing posts with label निबंध. Show all posts

Friday, October 21, 2022

निबंध डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 आज आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध पाहणार आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या निबंधाचा वापर आपण भाषणासाठी ही करू शकता. निबंधाच्या खाली आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी ही देण्यात आलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


            भारत हा वीर पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही देश आहे. 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशामधील महू या गावांमध्ये एका तार्‍याचा जन्म झाला. तो तारा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. तर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी हे होते. त्यांच्या आईच्या नावावरून पाळण्यात त्यांचे नाव भीम असे ठेवण्यात आले.

             बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरीबीची असल्यामुळे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एम ए ,पीएचडी ही पदवी घेतली व इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.

             भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान अवेहेलना त्यांना सहन होईना. 1920 साली राजश्री शाहू महाराजांच्या मदतीने 'मूकनायक' हे पाक्षिक काढले. 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. तेथे आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले.

          15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य भारताचे कायदामंत्री झाले. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' म्हणून ते ओळखले ओळखू लागले. त्यांनी अन टचेबल हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके होती.

 अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ~ निबंध क्रमांक 2 वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.





Sunday, October 16, 2022

निबंध दिवाळी

 दिवाळी



               दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. भारतात सर्वच लहान थोर लोक तो साजरा करतात. या सणाच्या वेळेस दाराबाहेर पणत्या लावतात. तसेच आकाश कंदील टांतागत आणि सुंदर रांगोळ्या सुद्धा काढतात. कार्तिक महिन्यात येणाऱ्या ह्या सणाचे एकूण पाच दिवस मानले जातात. पहिल्या दिवशी असते वसुबारस, दुसऱ्या दिवशी असते धनत्रयोदशी, तर तिसऱ्या दिवशी असते नरक चतुर्दशी. चौथ्या दिवशी पाडवा आणि लक्ष्मीपूजन असते. तर पाचव्या दिवशी भाऊबीज असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी बंधू हिशोबाच्या चोपड्यांची पूजा करतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. 

              दिवाळीत मुलांना शाळेला सुट्टी असते. नोकरदार लोकांना बोनस मिळतो. या सणाच्या निमित्ताने नवीन कपड्यांची खरेदी होते. घराला नवीन रंग दिला जातो. घराची साफसफाई केली जाते. गृहिणी चकल्या, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा, शेव असे अनेक गोडाचे आणि तिखटाचे प्रकार करतात.

              दिवाळीच्या वेळेस फटाके फोडले जातात. त्यामुळे हवा प्रदूषित आणि ध्वनी प्रदूषण होते. तसेच फटाक्यांच्या कारखान्यात लहान मुलांना कामाला लावले जाते. म्हणून फटाके बंद केले पाहिजेत.

 असा हा दिवाळीचा सण मला खूप आवडतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला तेच करा.



Wednesday, October 5, 2022

निबंध ~ अवकाशयात्री - सुनीता विल्यम्स

 ⚜️अवकाशयात्री ~ सुनीता विल्यम्स⚜️



           माणसाने आजपर्यंत अफाट प्रगती केली. आता तर तो अवकाशाचे वेद घेऊ लागला आहे. दूर दूरच्या ग्रहताऱ्यांवर जाण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. विविध ग्रहताऱ्यांवर जाण्यासाठी माणसाने आता तर अंतराळात अवकाश स्थानक उभारले आहे. या अवकाश स्थानकात अनेक अवकाशवीर जातात आणि तेथे आवश्यक अशी कामे करतात.

               अशीच एक अवकाशयात्री म्हणजेच सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला. तिला विज्ञानाची आवड होती. 1998 साली तिने अवकाश यात्रा शास्त्राच्या शिक्षणाची सुरुवात केली 12 डिसेंबर 2006 ला ती अवकाश स्थानकात जाऊन पोहोचली. तिने एकूण 194 दिवस अवकाश स्थानकात विविध कामे केली. इतका प्रदीर्घ काळ अवकाशात राहण्याचा मान मिळवणारी जगातील ती पहिली महिला ठरली आहे.

             अवकाश प्रवास पूर्ण झाल्यावर सप्टेंबर 2007 मध्ये ती भारतात आली होती. तेव्हा तिने आपले रोमांचक अनुभव सर्वांना ऐकवले. त्यामुळे भारतातील युवकांना आता अंतराळ प्रवासाची ओढ लागली आहे. अज्ञात गोष्टींचा वेध घेतल्यानेच माणसाची प्रगती होते. हा संदेश सुनीताने आपल्या कर्तुत्वाद्वारे दिला आहे.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️