⚜️ बुद्ध पौर्णिमा ⚜️
जीवनाच्या भवचकातून सुटून जाण्याचा मार्ग गौतमाने शोधून काढला आणि तो खऱ्या अर्थाने बुद्ध झाला. बुद्ध म्हणजे जागा झालेला. आपणच मोठमोठी दुःखे उत्पन्न करीत असतो कधीही न शमनारी तृष्णाच आपल्याला दुःखात बुडविते. तरी सारे जग तृष्णा-तृप्तीच्या मागेच आहे. जे दृष्ट प्रवृतीचे आहेत, ते द्रोहच पसरवितात आणि विनाकरण वैरभाव बाळगतात. त्यांच्याविषयी द्वेषाऐवजी उपेक्षाभाव ठेवला तर सर्वत्र विजय आहे. या जगात सर्वत्र दुःख आहे. याचे कारण वासनारूपी तृष्णा हे आहे., ती तृष्णा नष्ट केली तर दुःखही नष्ट होईल. मनुष्याने योग्य ज्ञान, योग्य भाषण, योग्य कार्य, योग्य व्यवसाय, योग्य ध्यान केले पाहिजे. हेच गौतम बुद्धाच्या ज्ञानाचे सार, मर्म होते.
गौतमबुद्धाचा जन्म नेपाळमध्ये कपिलवस्तूंच्या जवळ लुंबिनीवनात इ.स.पूर्व ५६३ मध्ये झाला. बालवयापासून या जगातील दुःखाची परंपरा पाहून त्यांचे मन करूणेने पाझरे. निरनिराळे अनुभव मिळविण्यात सहा वर्षे गेल्यावर त्यांना बोधिज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून गौतमांना गौतमबुद्ध म्हणून सारे जग ओळखू लागले. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बनारसमध्ये सारनाथला इसिपतनच्या मृगवनात त्यांनी पहिला उपदेश केला. त्याला 'धर्मचक्र प्रवर्तन' म्हणतात.
बुद्धाचा उपदेश अगदी साधा व सरळ होता. ते शाक्य कुळात लोकशाही वातावरणात वाढलेले हाते. त्यामुळे त्यांची जीवन दृष्टी लोकशाहीची होती. ते सर्वांकडे समान दृष्टीने पाहात. जनतेसाठी त्यांनी आठ मार्गाचा उपदेश केला. त्याला अष्टांग मार्गदर्शन म्हणतात. मानवासाठी पहिली पायरी म्हणजे, स्वतःच्या जीवनाला शिस्त लावणे. जो जागृत होण्याच्या वेळी जागृत होत नाही तो तरुण असो वा वृद्ध असो, तो आळशीच असतो. अशा माणसाला ज्ञानाची पायरी प्राप्त होत नाही. करुणा हा अत्युच्च सद्गुण बुद्धाने मानला. प्रेमाने साऱ्यांना जिंकता येते. हिंसेचा प्रतिकार
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.