धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती व पौराणिक कथा | dhanteras information in
धनत्रयोदशी या सणाला दीपावली मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती व धन याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदिशीचा चा दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीला आपल्याकडे असलेल्या धनाची म्हणजेच सोने, चांदी, दागिने यांची पूजा केली जाते व कुटुंबाच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्यातील तेराव्या दिवशी असते.
धनत्रयोदशीच्या पौराणिक कथा
हेमा नावाचा एक राजा असतो. त्याच्या पुत्राला अकाली मृत्यूचा श्राप मिळालेला असतो. या श्रापानुसार राजाचा मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा व राणी आपल्या मुलाला मिळालेल्या या श्रापामुळे खूप दुःखी असतात.
परंतु आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुखे उपभोगावी म्हणून त्याचे ते लग्नही लावून देतात. परंतु लग्नाच्या चौथ्याच दिवशी त्याच्या मुलाचा मृत्यू होणार ही गोष्ट त्याच्या पत्नीला समजल्यानंतर पत्नी त्याला त्या रात्री झोपू देत नाही. त्याच्याभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. तसेच महालामध्ये सर्व ठिकाणी दिवे लावून रोषणाई केली जाते व महाल हा अतिशय सुंदर रित्या सजवला जातो.
यम देवता महाला मध्ये प्रवेश करू शकणार नाही याची सर्व काळजी घेतली जाते. इकडे त्याची पत्नी एक ना अनेक युक्त करून आपल्या पतीला जागे ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि शेवटी ती वेळ येतेच यम सापाच्या रूपाने महालाकडे देऊ लागते मात्र जेव्हा तो महालात सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यमाची डोळे सोने आणि चांदीच्या दागिन्याने दिपून जातात त्याला समोरचे स्पष्ट दिसत नाही या कारणास्तव यमाला परत जावे लागते. अशाप्रकारे त्या राजपुत्राचे प्राण वाचवले जातात या दिवसाला यमदीपदान असेही म्हटले जाते या परंपरेमध्ये दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला केले जाते आणि त्या दिव्याला नमस्कार केला जातो.
धनत्रयोदशीची दुसरी पौराणिक कथा
महर्षी दुर्वासा यांनी दिलेल्या श्रापातून मुक्त होण्यासाठी असूर व सूर यांनी मिळून समुद्रमंथन केले. तेव्हा त्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी व धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला. धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार समजला जातो सर्व वेदांमध्ये ते निष्णात होते. मंत्र, तंत्राचे ते उत्तम जाणकार होते. त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अमृत रूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले. आणि म्हणून धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हटले जाते.
म्हणून या दिवशी धन्वंतरी चे पूजन केले जाते. तसेच या दिवशी लक्ष्मीचेही पूजन केले जाते.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
वसुबारस सणाची माहिती वाचायची असेल तर खाली टच करा.
No comments:
Post a Comment