🎇 दीपावली 🎆
दीपावली हा दिव्यांचा सण आहे. निराशेवर आशेचा विजयोत्सव म्हणजे दीपावली साजरी केली जाते. आपल्या देशात अनेक मोठे सण, मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सणांपैकी एक म्हणजे दीपावली. हा दिवस रावणावरील भगवान श्री रामाचा विजय म्हणून किंवा वाईट वर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.
कार्तिक मास अमावस्येच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राक्षसाचा वध करून आणि चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. प्रभू श्री राम यांच्या स्वागतासाठी आयुध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंदोत्सव साजरा केला होता. ही परंपरा आजही कायम आहे. दिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर लोक आपली घरी स्वच्छ करतात. दिवाळीचा फराळ म्हणून चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा असे वेगवेगळे पदार्थ बनवतात.
दीपावली चा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. सर्व लोक नवीन कपडे घालतात आणि घरात लक्ष्मी देवीची पूजा करतात. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून या दिवशी दिवे लावून वातावरण प्रकाशमान केले जाते.
दीपावली या सणाचे मुख्य पाच दिवस आहेत. ते म्हणजे धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा, पाडवा आणि भाऊबीज हे सर्व सण सर्वच लोक आनंदाने साजरे करतात. या दिवसांमध्ये लोक नवीन कपडे खरेदी करता. तर लहान मुले फटाके वाजवून ही दिवाळी साजरी करतात.
दिवाळीचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो. नवीन जीवन जगण्यासाठी उत्साह प्रदान करतो. पण काही लोक या दिवशी जोरजोरात मोठे फटाके फोडून पर्यावरण दूषित करतात. आपण हे टाळून पर्यावरणाला जपून हा सण साजरा केला पाहिजे. तरच हा सण सार्थकी लागेल.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर इतर निबंध वाचायचे असतील तर खाली टच करा.
No comments:
Post a Comment