🏠 घर दर्शक शब्द 🏠
ज्याप्रमाणे माणसांच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण घर म्हणतो. त्याप्रमाणे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे असतात. काही प्राणी, पक्षी स्वतःचे घर बनवतात, तर काहींची घरे बनवली जातात, तर काही निसर्गनिर्मित घरांमध्ये आश्रय घेतात. विशेषता मानवाने आपल्या उपयोगासाठी पाळलेले प्राणी, पक्षी हे मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात. तर रानावनात मोकाट फिरणारी जंगली प्राणी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांच्या घरासाठी वेगवेगळी नावे दिली जातात. त्या नावांना आपण घर दर्शक शब्द असे म्हणतो.
तर चला पाहूयात काही पशु पक्षी व प्राण्यांचे घर दर्शक शब्द
⚜️ कोंबडीचे 👉 खुराडे
⚜️ मधमाशांचे. 👉पोळे
⚜️ हत्तीचा. 👉 हत्तीखाना / अंबारखाना
⚜️ वाघाची 👉 गुहा / दाट झाडी
⚜️ घोड्याचा 👉 तबेला पागा
⚜️ गाय / बैल 👉 गोठा
⚜️ कावळ्याचे 👉 घरटे
⚜️ सुगरणीचा 👉 खोपा
⚜️ सिंहाची 👉 गुहा
⚜️ पक्षाचे 👉 घरटे
⚜️ पोपटाचा 👉 पिंजरा / ढोली
⚜️कोळीचे 👉 जाळे
⚜️मुंग्या साप 👉 वारूळ
⚜️ उंदीर 👉 बीड
⚜️घुबडाची। 👉 डोली
⚜️माणसाचे। 👉 घर
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर घर दर्शक शब्द चा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
घर दर्शक शब्द या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असल्यास खाली टच करा.
No comments:
Post a Comment