⚜️ माझा मित्र ⚜️
माझ्या मित्राचे नाव अथर्व आहे. तो माझ्या वर्गात आहे. आणि माझ्याच गल्लीत राहतो. त्यामुळे आम्ही दोघे कायम एकत्रच असतो. शाळेत एकत्र जातो आणि एकत्रच परत येतो. त्यामुळे आम्हाला 'एकमेकांचे शेपूट' असे चिडवतात.
शाळेत त्याचा नंबर नेहमी पहिला असतो. आणि माझा मात्र सातवा असतो. पण तरी तो भाव खात नाही आणि माझ्याशी बोलताना गर्विष्ठपणा करीत नाही.
माझी आई कधी कधी मला म्हणते की 'तो बघ किती हुशार आहे. नाहीतर तू' तेव्हा मात्र मला आईचा राग येतो. बाबाही तिला म्हणतात की दोन मुलांची तुलना कधीच करू नये.
अथर्वचे आई-बाबा शहरात राहतात. तो येथे आजी सोबत राहतो. त्यामुळे त्याला आमच्या घरी यायला खूप आवडते.
आम्ही दोघे मिळून छतावर पतंग उडवतो. गल्लीमध्ये क्रिकेट खेळतो. बॅडमिंटन सुद्धा खेळतो.
अथर्व चे आई-बाबा प्रत्येक सुट्टीला अथर्व ला भेटायला येतात. त्याचबरोबर त्याला खेळणी व खाऊही घेऊन येतात. आणलेला खाऊ व खेळणी आम्ही दोघे एकत्र मिळून संपून टाकतो.
नेहमीप्रमाणे याही दिवाळीला अथर्व त्याच्या आई-वडिलांकडे जाणार आहे. परंतु यावर्षी मीही त्याच्याबरोबर शहरात दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहे. यासाठी अथर्वच्या आई-बाबांनी माझ्या आई-बाबांना सांगून ठेवले आहे.
एवढा चांगला मित्र मला मिळाला हे माझे केवढे भाग्य आहे.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध वाचन करण्यासाठी खालील बटनाला टच करा
No comments:
Post a Comment