SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label मराठी निबंध. Show all posts
Showing posts with label मराठी निबंध. Show all posts

Saturday, October 1, 2022

निबंध~ माझा मित्र

 ⚜️ माझा मित्र ⚜️



              माझ्या मित्राचे नाव अथर्व आहे. तो माझ्या वर्गात आहे. आणि माझ्याच गल्लीत राहतो. त्यामुळे आम्ही दोघे कायम एकत्रच असतो. शाळेत एकत्र जातो आणि एकत्रच परत येतो. त्यामुळे आम्हाला 'एकमेकांचे शेपूट' असे चिडवतात.

             शाळेत त्याचा नंबर नेहमी पहिला असतो. आणि माझा मात्र सातवा असतो. पण तरी तो भाव खात नाही आणि माझ्याशी बोलताना गर्विष्ठपणा करीत नाही.

             माझी आई कधी कधी मला म्हणते की 'तो बघ किती हुशार आहे. नाहीतर तू' तेव्हा मात्र मला आईचा राग येतो. बाबाही तिला म्हणतात की दोन मुलांची तुलना कधीच करू नये.

            अथर्वचे आई-बाबा शहरात राहतात. तो येथे आजी सोबत राहतो. त्यामुळे त्याला आमच्या घरी यायला खूप आवडते.

             आम्ही दोघे मिळून छतावर पतंग उडवतो. गल्लीमध्ये क्रिकेट खेळतो. बॅडमिंटन सुद्धा खेळतो.

              अथर्व चे आई-बाबा प्रत्येक सुट्टीला अथर्व ला भेटायला येतात.  त्याचबरोबर त्याला खेळणी व खाऊही घेऊन येतात. आणलेला खाऊ व खेळणी आम्ही दोघे एकत्र मिळून संपून टाकतो. 

               नेहमीप्रमाणे याही दिवाळीला अथर्व त्याच्या आई-वडिलांकडे जाणार आहे. परंतु यावर्षी मीही त्याच्याबरोबर शहरात दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहे. यासाठी अथर्वच्या आई-बाबांनी माझ्या आई-बाबांना सांगून ठेवले आहे.

एवढा चांगला मित्र मला मिळाला हे माझे केवढे भाग्य आहे.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


इतर निबंध वाचन करण्यासाठी खालील बटनाला टच करा


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


Sunday, September 4, 2022

निबंध ~ शिक्षक दिन

 शिक्षक दिन

5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे. ते भारताची दुसरे राष्ट्रपती होते. ते जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ होते. विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. म्हणून या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षक दिनाला देशभर शिक्षकांचा सन्मान करतात. आदर्श शिक्षकांना पारितोषिके दिली जातात. त्यांचा गौरव केला जातो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

आमच्या शाळेत सुद्धा शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यादिवशी शिक्षकांची सर्व कामे विद्यार्थीच करतात. म्हणजेच कोणी मुख्याध्यापक बनलेले असते. तर कोणी शिक्षक बनलेले असते. तर कोणी शिपाई यातही सर्वात चांगले काम ज्या विद्यार्थ्यांने केलेले आहे. त्याचा या ठिकाणी सत्कार केला जातो.

असा हा शिक्षक दिन आम्ही आमच्या शाळेत उत्साहाने पार पडतो.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️