⚜️ एकाच शब्दाचे भिन्न अर्थ ⚜️
या शब्दप्रकारात एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे निघतात, असे अनेक शब्द आपण नेहमी व्यवहारात वापरतो. प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारताना एखादे वाक्य देतात व एकच शब्द दोन किंवा अधिक अर्थाने विचारतात. उदा. सोन्याचे दर दर दिवशी बदलतात. यातील पहिला 'दर' शब्दाचा अर्थ 'किंमत' व दुसऱ्या 'दर' शब्दाचा अर्थ 'प्रत्येक दिवशी' असा होतो. या प्रकारचा सराव लेखणीतून, संभाषणातून घ्यावा. कधी कधी नुसते शब्दांचे अर्थ विचारले जातात. म्हणून अशा प्रकारच्या शब्दांचे पाठांतर असायला हवे.
1) अनंत - अमर्याद, आकाश
2) अंक - मांडी, आकडा, नाटकाचा एक भाग भांडणाचे कारण, वेदना
3) अभंग - काव्यप्रकार, न फुटलेली 4) कळ
5) कर - हात, सरकारी सारा, किरण
6) काळ - मृत्यू, वेळ, यम
7) कर्ण - कान, महाभारतातील योध्दा, त्रिकोणाची काटकोनासमोरील बाजू
8) खंड - जमिनीचा सलग मोठा भाग, बंद पडणे
9) घास - जेवणातील एक घास, गवताचा एक प्रकार
10) खार • एक प्राणी, अंबवणातील एक पदार्थ
11) घाट - डोंगरातील रस्ता, प्रयत्न करणे, नदीच्या पायऱ्या
12) चमचा - एक पात्र, ढवळा-ढवळ करणाऱ्या माणसाचे विशेषण
13) जलद - ढग, लवकर
15) जीवन - पाणी, आयुष्य
14) जरा - म्हातारपण, थोडेसे
16) डाव - खेळी, कपट, कारस्थान, प्राचीन उपचार पध्दती
17) तळी - खंडेश्वराचा आराधना प्रकार, तलाव, तळाला
18) तट - किल्ल्याची भिंत, किनारा, कडा
19) तीर - काठ, बाण
20) तान त्रास, गायनातील स्वर, ओढ देणे
21 ) दंड - बाहू, शिक्षा -
22) धड - मानेखालचा शरीराचा भाग, नीटनेटके, स्पष्ट
23) ध्यान - समाधी, चिंतन
24) नाद - आवाज, छंद
25) नाव - होडी, नावलौकीक, किर्ती
26) पर - पिस, परका, परंतु
27) पक्ष - राजकीय संघटना, पंख, पंधरवाडा, वादातील बाजू
28) पार - पलीकडे, झाडाभोवतीचा ओटा.
29) पात्र - भांडे, नदीचे पात्र, योग्य, कारणीभूत
30) पूर नगर, पाण्याचा पूर
31) पुरी - खाण्याचा पदार्थ, नगर
32) भाव - किंमत, दर, भावना
33) माया- धन,ममता,कपडा शिवताना कडेनी सोडलेली जागा.
34) भेट - नजराणा, भेटणे
35) माळ - फुलांची माळ, ओसाड जागा
36) मान - मोठेपणा, शरीराचा एक भाग.
37) वर - वरची दिशा, आशीर्वाद, नवरा
38) वाणी - व्यापारी, सरपटणारा किडा, बोल
39) वात-वारा, दिव्याची वात, विकार
40) वारी- यात्रा, नियमीत फेरफटका
41) हार - पराभव, फुलांची गुंफलेली माला.
42) साल - वर्ष,झाडांची साल
43) साथ - मदत, रोगाची साथ
44) शृंग - सिंग, शिखर
45) वास - सुगंध, वस्ती
46) सूत - दोरा, सारथी, संधान
47) मित्र- सूर्य, दोस्त
48) चपला - वीज, वहान
49) नारळ - श्रीफळ, नारिकेल
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
जर तुम्हाला एकाच शब्दाचे भिन्न अर्थ या घटकाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
तुम्हाला जर एकाच शब्दाचे भिन्न अर्थ या घटकाची सराव चाचणी सोडवायची असेल तर खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी माझ्या खालील व्हाट्सअप ग्रुपल join व्हा.