SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Show all posts
Showing posts with label डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Show all posts

Friday, April 12, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे बाबत

 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे बाबत

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती


विषय : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत

संदर्भ : शासन परिपत्रक क्र GAD-49022/14/2023-GAD (DESK-29) दिनांक 27.12.2023


मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सन 2024 मध्ये आयोजित करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक 27.12.2023 च्या परिशिष्टानुसार कळविण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी संबंधीत विषयावर परिसंवाद, त्यांच्या विचारधारांवर आधारित ग्रंथोत्सव, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच त्यांच्या कार्याशी संबंधीत इतर नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

संदर्भाधीन शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर Gr ची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील बटनाला टच करा



Tuesday, October 18, 2022

निबंध - डॉ बाबासाहेब आंबेडकर

⚜️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⚜️



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशात झाला. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार म्हणून काम करीत असत. आंबेडकर हे त्यांच्या आई-वडिलांचे चौदावे आपत्य होते.

              सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांचे वडील सातारा येथे राहण्यास आले. आंबेडकर हे जातीने महार म्हणजे अस्पृश्य होते. त्यामुळे त्यांना जातपात या विषयावरून खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणी त्यांना शाळेत शिकण्यासाठी वेगळे बसावे लागे.

           परंतु ते बुद्धीने खूप हुशार होते. त्यामुळे ते कष्टांना अजिबात न डगमगता इंग्लंड येथे जाऊन शिकले. तिथे उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर आंबेडकरांनी दलितांसाठी चळवळ उभारली. दलितांसाठी आणि मागास जातीच्या लोकांसाठी वेगळा मतदार संघ हवा आणि आरक्षण हवे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

            स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करण्याचे काम नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवले. त्यांनी खूप अभ्यास करून भारताची राज्यघटना निर्माण केली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.

         हिंदू धर्मातील जाचक रूढींना कंटाळून आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी दलितांना स्वाभिमानाने जगणे शिकवले. असे ते महामानव होते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर निबंध वाचायचे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली टच करा.




🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सराव चाचणी सोडवायची असेल तर खालील बटनाला टच करा.