सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.
विषयः सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. यु-डायस प्लस पोर्टलवरील दि. २२/०८/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील २६.२३९ एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे आणि यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षक व शाळांची माहिती भरणे बाकी आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. ०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०,०० ते सायंकाळी ५.३० या वेळात जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व मनपाचे MIS-Coordinator यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेमध्ये पुढील मुद्यांवर आढावा घेण्यात येणार आहे-
🎗️ सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमनाये सर्व विद्याथ्यर्याचे Promotion चे काम पूर्ण करून घेणे.
🎗️ सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे,
🎗️ राज्य अभ्यासक्रम, CBSE Board, IB Board या शाळांचे शाळानिहाय वर्गीकरण, शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक, शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक, शाळेचे माध्यम याची जिल्ह्यांचे सर्व यादी सादर करणे,
🎗️ शून्य विद्यार्थी, एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे.
🎗️ शून्य शिक्षक, एक शिक्षक, दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करून घेणे,
🏆 Performance Grading Index (PG) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे.
⚜️ सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.
⚜️ द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.
⚜️ आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.
⚜️ विद्यार्थी, विद्यार्थीनी व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.
⚜️ इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.
⚜️ मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.
⚜️ व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.
⚜️ Library/Book Bank/Reding Comer, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.
⚜️ शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.
⚜️ शाळा व्यवस्थापन समिती माहिती.
⚜️ मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.
तरी उपरोक्त कार्यशाळेसाठी संगणक प्रोग्रामर व MIS-Courdinator यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉपसह उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर परिपत्रकाचे PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.