शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत...
विषय : शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत...
उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. संदर्भ क्र. ०२ अन्वये स्पर्धेच्या निवड यादीस व खर्चास मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त करून आली.
संदर्भ क्र.३ नुसार सदर स्पर्धेचा जिल्हा व तालुकास्तर निकाल घोषित करण्याची प्रक्रिया पार पाडून स्पर्धेच्या ● बक्षीस वितरणासाठी आवश्यक निधी मागणी पत्र प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडून प्राप्त करून घेण्यात आले.
संदर्भ क्र. ४ नुसार शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस रक्कम तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत मंजूर टिप्पणी नुसार निधी वितरीत करण्याचा आदेश देण्यात आला. तद्नुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तर व तालुकास्तर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्या साठी सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे निधी वितरण केला जात आहे. उपरोक्त नुसार कार्यक्रमात विजेत्यांना रोख रकमेसह ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात यावे. ट्रॉफी व प्रमाणपत्रावर राज्यस्तरीय कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या स्पर्धेच्या स्तरानुसार मजकुरात योग्य तो बदल करून समान मजकूर वापरण्यास हरकत नाही. निधीच्या विनियोगासाठी खालील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
१) सर्व कार्यालयांनी निधीचा विनियोग करतांना आवश्यक वित्तीय नियमांचा तसेच दि.०१/१२/२०१६ च्या शासननिर्णयातील सूचनांचे खरेदी प्रक्रिया राबवितांना पालन करणे आवश्यक आहे.
२) उपयोगिता प्रमाणपत्र दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत परिषदेस सादर करावे.
३) लेखापरीक्षणाच्या दृष्टीने सर्व लेखे आपल्या स्तरावर जतन करून ठेवावे.
४) ज्या बाबींसाठी निधी वितरीत केला आहे त्याच बाबींसाठी निधीच्या मर्यादेत खर्च करावा.
५) कार्यक्रमाचे उपस्थिती पत्र व निवडक छायाचित्र संकलित करून ठेवावे.
६) जिल्हास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती जिल्हा रु. ५०,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.
७) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या ५०% पेक्षाजास्त (म्हणजे २५पेक्षा अधिक बक्षिसे) विजेते असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती तालुका रु. १०,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.
८) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या २५% पेक्षा जास्त मात्र ५०% पेक्षा कमी विजेते (म्हणजे १३ ते २५ बक्षिसे) असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती तालुका रु. ५,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.
९) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या २५% पेक्षा कमी विजेते (१३पेक्षा कमी) असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधी देण्यात येणार नाही. अशा तालुक्यांनी आपल्या स्तरावर संबंधित विजेत्यांना यथायोग्य सन्मानित करावे.
१०) जिल्हा स्तर विजेते यांना रु. १३०/- तर तालुका स्तर विजेते यांना रु. १००/- सर्वांसाठी समान दर्जाचे प्रमाणपत्र, परंतु जिल्हास्तर व तालुकास्तर आणि प्रथम, द्वितीय व तृतीय या विजेत्यांना उपलब्ध रकमेत त्या-त्या क्रमांकास शोभेल अशी ट्रॉफी देण्यात यावी.
यानुसार सर्व कार्यालयांनी उपरोक्त मंजूर कार्यक्रम रकमेचा विचार करून आपल्या जिल्ह्यात बक्षीस वितरणाचे नियोजन करावे. यानुसार बक्षीस संख्या, कार्यक्रम घेण्यासाठी उपलब्ध रक्कम यानुसार जिल्हास्तर स्वतंत्र / जिल्हा स्तर एकत्रित, निधी देण्यात आलेल्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र किंवा जोडून, अश्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे ठिकाण/ठिकाणे, तालुका / जिल्हा, एकत्र / जोडून; बक्षीस वितरण समारंभआयोजित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस देण्यात येत आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून खालील बाबींवर खर्च करता येईल,
१) विजेते व अतिथी यांचेसाठी चहा, नाष्टा / भोजन / वर्किंग लंच
२) कार्यक्रमाचा banner
३) कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट
४) बैठक व स्टेज व्यवस्था
५) आदरातिथ्य
६) कार्यक्रमाच्या दृष्टीने इतर अनुषंगिक खर्च
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठीनिधी वितरण तक्ता
तरी उपरोक्तनुसार १ ते ३४ क्रमांकावरील जिल्ह्यांचा निधी त्या-त्या जिल्ह्याच्या जि.शि.प्र.सं आणि ३५ चं ३६ क्रमांकावरील (मुंबई DyD व BMC) जिल्ह्यांचा निधी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना वर्ग केला जात आहे. त्यानुसार सर्व विजेत्यांना त्यांच्या खात्यात बक्षीस वितरण करणे, जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण समारंभ आयोजित करणे व त्यामध्ये विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून सन्मानित करणेसाठी खर्च रु. ४६४९९७७०/- (अक्षरी रु. चार कोटी चौसष्ठ लक्ष्य नव्याण्णव हजार सातशे सत्तर मात्र वर्ग करण्यात येत आहे.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा