SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label PAT 1. Show all posts
Showing posts with label PAT 1. Show all posts

Friday, July 26, 2024

पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत ......

 पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत ......


विषय : पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत .....


संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२४- २५/०२९२६, दि.१९ जून २०२४.


उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे आयोजन दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहे. तसेच याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-१) चे गुण दि. २७ जुलै २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे.

उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ. / माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.

१. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) चाटबॉट मार्गदर्शिका :



https://bit.ly/PATUserManual


२. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) गुणांची नोंद करणेसाठी लिंक - https://bit.ly/PAT-MH


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.




Friday, July 19, 2024

PAT 1 ऑनलाइन गुणदान

    PAT 1 गुणदान

PAT 1 चे गुण आँनलाईन भरनियास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गुणदान भरण्यासाठी खालील चित्राला टच करा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

SwiftChat by ConveGenius हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
गुणदान तक्ते PDF स्वरूपात

इयत्ता तिसरी 

भाषा 

गणित

 इंग्रजी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता चौथी 

भाषा 

गणित

 इंग्रजी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता पाचवी

भाषा 

गणित

 इंग्रजी

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सौजन्य ~ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना छत्रपती संभाजीनगर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE