SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, August 5, 2022

क्रांतिसिंह नाना पाटील

 क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र या खेडेगावात 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्यांच्या घरी गरिबी होती. वडील रामचंद्र गावचे पाटील होते. त्यांनी आपल्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्या काळची मुलकी परीक्षा नानांनी उत्तीर्ण केली. ते थेट तलाठी म्हणून काम पाहू लागले. 

पुढे नाना पाटील हे सत्यशोधक समाजात सामील झाले. अनेक छोट्या-मोठ्या खेड्यात फिरून त्यांनी समाज रचना पाहिली. त्यावेळी लोक हुंड धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा वाढवू नका असे ते उपदेश करीत. वैज्ञानिक विचारसरणी शिवाय अंधश्रद्धा जाणार नाही, हे त्यांनी जाणले होते. अनेक प्रकारे ते लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. 

नानांच्या मनाला आणखीन एक गोष्ट सतत होती. ती म्हणजे अस्पृश्यता. सर्व माणसे प्रभूची लेकरे आहेत. तर मग हा छोटा, हा मोठा भेदभाव कशासाठी. एकमेकांना कमी मानल्यामुळे अडविले जाते आणि त्यामुळे समाजाची म्हणजे एका अर्थी राष्ट्राची प्रगती कमी होते. जीवन उत्तम प्रकारे जगण्याचा समान हक्क सर्वांना आहे. सर्वांनी प्रगती होऊ लागली तर त्यातच सर्वांचे कल्याण आहे. त्यांनी त्यावेळी समाजासाठी स्पृश्य-अस्पृश्य ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाज जागृती झाली.

 त्यांच्या मनात महात्मा गांधीं बद्दल अत्यंत आदराची भावना होती; परंतु इंग्रज फक्त अहिंसेच्या मार्गाने ऐकणार नाहीत. असे नेत्यांना धडा शिकवला पाहिजे असे त्यांना वाटत होते त्यांनी 1942 सालच्या 'छोडो भारत' आंदोलनात भाग घेतला आणि सातारला प्रतिसरकार स्थापन केले ते पत्री सरकार या नावाने ओळखले जात असे ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी दहा हजार रुपये इनाम लावला; परंतु नाना कोणाच्या हाती आले नाहीत.

 एकदा राज्य आपल्या हाती आले की प्रत्येक गावात लोकनियुक्त पंचान कडून त्या गावचा कारभार चालवायचा, न्यायदान करायचे अशी नानांची ग्राम राज्याची कल्पना होती. त्याप्रमाणे कराड , वाळवे तासगाव इत्यादी गावात पंच सभा व न्यायदान समित्या स्थापन केल्या. नानांच्या प्रतिसरकार मुळे गावातील अनेक व्यसनाधीन लोकांना आळा बसला. 

1946 ला भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार सुरू झाला व काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारावर आले. त्यामुळे नानांचे पकड वॉरंट रद्द करण्यात आले. नानांनी सांगितले की माझ्या सर्व भूमिगत यांचे पकड वॉरंट रद्द करणार असाल तर हजर राहील. मंत्रिमंडळाने ते मान्य केले. आपल्या ा सर्व सहकार्‍यांचे नाना कोरेगावला प्रकट झाले. पुढे ते दोन वेळेला लोकसभेवर निवडून गेले. भारतीय संस्कृती श्रेष्ठ मंडळाचे सदस्य म्हणून ते रशियाला जाऊन आले. गोरगरिबांना बद्दल त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता. क्रांतिकारी मार्गांनी इंग्रज शासनाला हादरवणारे महाराष्ट्रातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांना ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1976 साली झाला.