मदर तेरेसा
मदर तेरेसा यांचे मूळ नाव Anjezë Gonxhe Bojaxhiu हे होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट इ.स. 1910 अल्बानिया येथे झाला. त्यांच्या घरी गरीबी होती. बालपणी त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आईने कष्ट करून मुलीला मोठे केले. धर्मासंबंधीची काही पुस्तके त्यांनी वाचली. त्यामुळे सहाजिकच अंतकरणांमध्ये धर्माबद्दल आवड निर्माण झाली.
1958 साली त्यांनी चर्चमध्ये जोगिणीची दीक्षा घेतली. आणि त्या ' मिशनरी ' बनल्या. त्यामुळे त्यांचे नाव मदर तेरेसा झाले. वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी जगातील दुःख पाहिले. आपल्यासारखे अनेक लोक दुःखी आहेत. हे त्यांनी ओळखले. आता आपण 'दुःखितांचे अश्रू पुसायचे' असा निर्धार करून त्या भारतात आल्या.
कलकत्त्यामध्ये त्यांनी धर्मप्रचारिकेचे काम सुरू केले. काही दिवस शिक्षिका म्हणूनही कार्य केले. पण तेथेच त्यांचे मन रमेना. कलकत्त्यामध्ये कालीमातेच्या मंदिराजवळ एक पडकी धर्मशाळा होती. तेथे एक गरीब रुग्ण राहत होता. त्या रुग्णाची कोणी सेवा करणारे नव्हते. मदर तेरेसा पुढे आल्या, आणि त्या रुग्णाची सेवा करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी या कार्याला विरोध केला. मदर तेरेसांनी सांगितले की रुग्णाची सेवा करणे हा माझा प्रामाणिक हेतू आहे. यांची सेवा करणारे कोणी नाही म्हणून मी सेवा करते. हा विचार लोकांना पटला आणि त्यांनी विरोध थांबवला.
काही काळ त्या कलकत्त्याच्या सेंट मेरी विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या काळात त्यांनी कलकत्ता येथे अनेक निराधार लोक दिसून आले. रोगी लोकांना कोणी वाली नाही, याची जाणीव झाली. ही अवस्था पाहून त्यांच्या हृदयातील करुणाभाव जागृत होत होता.
मदर तेरेसा पाटण्याला आल्या आणि तेथे त्यांनी परिचारिकेचे शिक्षण घेतले. त्यामुळे गोरगरिबांची रुग्णांची सेवा कशा प्रकारे करावी याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले. 1948 साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. त्यामुळे भारतातच राहून आपले सेवा कार्य करायचे असे त्यांनी निश्चित केले.
पुन्हा कलकत्त्याला येऊन 'मिशनरीज ऑफ चँरिटी' नावाची सेवाभावी संस्था सुरू केली. मदर तेरेसांनी आपली संपूर्ण जीवन सेवा कार्यासाठी वाहून घेतले होते. कलकत्त्यात त्यांचे कार्य वाढू लागले. कोणत्याही प्रकारचा रुग्ण असला तरी त्या सेवा कार्य करत होत्या. त्यांच्या मनात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नव्हता व कसली भीतीही नव्हती. जीवावर उदार होऊन त्या कार्य करत होत्या. त्यांच्या कार्याचा कीर्तीसुगंध संपूर्ण देशभर पसरला.
त्यांच्या कार्याचा व्याप वाढू लागला. अनेक मंडळी या सेवाकार्यात सामील झाल्या. त्यांना आर्थिक मदत मिळू लागली. त्यांनी वृद्धांसाठी " निर्मळ हृदय " कुष्ठरोग्यांसाठी " शांतीनगर" अनाथ बालकांसाठी " निर्मला शिशु भवन " अशा अनेक संस्था काढल्या व मोठ्या उत्साहाने अनेकजण यामध्ये सामील होऊन सेवा करू लागले. अशा संस्थेचे देशात जाळे निर्माण झाले. लोकांनी उदारहस्ते त्यांना मदत केली.
मदर तेरेसांची कीर्ती जगात प्रसिद्ध पावली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार लाभले. 'पंडित नेहरू पुरस्कार, मॅगसेस पुरस्कार, टेंम्पल्टी पुरस्कार असे पुरस्कार मिळाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 1979 मध्ये त्यांना जागतिक शांततेचा " नोबल पुरस्कार " मिळाला. भारताचे नाव उज्वल केल्यामुळे त्यांना " भारतरत्न " हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार 1980 साली प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी गोरगरिबांसाठी खर्च केले. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता शुद्ध मनाने गरिबांची रुग्णांची सेवा करत राहिल्या. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1997 रोजी कोलकाता येथे झाला..