SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, September 2, 2022

माझी शाळा

⚜️माझी शाळा⚜️



         माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओंडोशी आहे. माझी शाळा माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मी शाळेत रोज चालत जातो.

        आमच्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे. तेथे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरतात.

           शाळेभोवती मोठे मैदान आहे. ते आम्हाला खूप आवडते. कारण तिथे खेळायला मिळते. तसेच शाळेने एक छोटी बागही केली आहे. त्या बागेत वेगवेगळी औषधी वनस्पती लावलेली आहे. तिथे आम्हाला बागकाम करायला नेतात.

        आमच्या शाळेत छोटे ग्रंथालय आहे. आम्हाला मोकळ्या तासाला तिथून पुस्तके वाचायला देतात. घरीही न्यायला देतात. शाळेतील वर्ग अतिशय सुंदर आहेत. तसेच मुख्याध्यापक खोली ही अतिशय सुंदर आहे.

           आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नांगरे सर खूप उत्साही असतात. त्यामुळे सगळीकडे ज्या काही आंतरशालेय स्पर्धा भरतात त्या सर्व स्पर्धा भाग घ्यायला ते आम्हाला पाठवतात. खेळातही आमची शाळा पुढे आहे. आंतरशालेय स्पर्धेमध्ये आमच्या शाळेला खूप बक्षीसही मिळाली आहेत.

         आमचे शिक्षक ही खूप मनमिळावू असल्यामुळे शाळेत जाणे हा आनंदाचा अनुभव होतो.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️