SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, September 2, 2022

होमरूल चळवळ (ॲनी बेझंट यांचा जीवन परिचय )

⚜️होमरूल चळवळ⚜️


⚜️ ॲनी बेझंट ह्या जन्माने आयरिश होत्या 1893 पासून त्या भारतात राहत होत्या. त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून समाज कार्य करण्यास सुरुवात केली होती.

⚜️ 1914 साली ॲनी बेझंट काँग्रेसमध्ये आल्या होत्या.

⚜️ 1916 साली लोकमान्य टिळकांच्या मदतीने भारता ( मद्रास प्रांत ) मध्ये ॲनी बेझंट यांनी होमरूल लीग चळवळीची सुरुवात केली.

⚜️ मद्रास प्रांतातील अड्यार या ठिकाणी ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची शाखा स्थापन केली.

⚜️ होमरूल लीग म्हणजे स्वशासन किंवा स्वराज्य होय.

⚜️ ऍनी बेझंट यांनी 2 जानेवारी 1914 रोजी दि कॉमनवील हे साप्ताहिक सुरू केले.

⚜️ महाराष्ट्रात होमरूल लीग चळवळीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती.( एप्रिल 2016 )

⚜️ होमरूल चळवळीची सुरुवात सर्वप्रथम आयर्लंड या देशांमध्ये झाली होती.

⚜️ होमरूल लीग संघटनेचे सचिव जॉर्ज अरुंडेल हे होते.

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


⚜️ॲनी बेझंट⚜️


⚜️ जन्म एक ऑक्टोबर 1847 लंडन येथे.

⚜️ संपूर्ण नाव ~ ॲनी फ्रॅंक बेझंट

⚜️ वडील ~ विलियम पेजवुड

⚜️ आई एमिली पेजवुड

⚜️ॲनी बेझंट यांचे शिक्षण इंग्लंड व जर्मनी येथे झाले.

⚜️ॲनी बेझंट या थिऑसॉफिकल विचाराच्या, महिला अधिकाराच्या समर्थक, लेखक, वक्ता, भारत प्रेमी राजकीय नेत्या होत्या.

⚜️ फ्रॅंक बेझंट यांच्याशी त्यांचा विवाह 1867 मध्ये झाला परंतु दोघांत विचारांच्या विरोधामुळे मतभेद होऊन 1874 ला घटस्फोट झाला.

⚜️ आदमीयवादी विचारांच्या चार्लस ब्रेडला यांच्यामुळे ॲनी बेझंट खूप प्रभावित झाल्या.

⚜️ त्यांच्या लेख व विचारांनी त्यांच्याबाबत भारतीयांमध्ये स्नेह निर्माण केले आता त्या भारतीयांबाबत त्यांच्या समस्यांबाबत दिवस-रात्र विचार करू लागल्या.

⚜️ 1883 मध्ये त्यांनी सोशालिस्ट डिफेन्स संघटना स्थापन केली.

⚜️ 1889 मध्ये न्यूयॉर्क येथे मॅडम ब्लाव्हटस्की, कर्नल ऑलकॉट यांनी थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन केली. ॲनी बेझंट या संस्थेच्या 1889 ला सदस्य बनल्या.

⚜️ त्यांनी पाश्चात्य भौतिकवादी संस्कृतीवर कठोर टीका केली.

⚜️ 1893 ला शिकागो सर्व धर्म परिषदेत त्यांनी भाग घेतला. त्याच वर्षी त्या भारतात आल्या.

⚜️ त्यांनी भारतीय संस्कृती, वेद, उपनिषद, साहित्य यांचा वाराणसी येथे अभ्यास केला. संस्कार व हृदयाने आपण भारतीय आहोत असे त्यांना वाटू लागले.

⚜️ 1898 मध्ये वाराणसी येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली.

⚜️ 1907 ला त्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा बनल्या.

⚜️ 1916 ला ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली व होमरूल चळवळ चालवली.

⚜️ 1917 च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषवले. ( पहिल्या महिला अध्यक्ष)

⚜️ वृत्तपत्रे ~ द कॉमनवील, न्यू इंडिया.

⚜️ लेखन ~ त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटी, भारतीय राजकारण व इतर विषयांसंबंधी प्रचंड लेखन केले. यात मुख्यतः इन डिफेंन्स ऑफ हिंदुइझम, इंडिया अ नेशन, हाऊ इंडिया ब्रॉट हर्ड फ्रीडम , इंडियन आयडियल्स

⚜️ ॲनी बेझंट यांचे निधन 20 सप्टेंबर 1933 मद्रास येथे झाले.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️