⚜️ अथर्व आणि फुटाणेवाला⚜️
अथर्व हा खूप हुशार आणि धीट मुलगा होता. एकदा रस्त्याने जाताना त्याला एक फुटाणे विकणारा फुटाणेवाला दिसला. कडून त्यांनी फुटाणे विकत घेतले. परंतु फुटाणे वाल्याने त्याला वजनापेक्षा कमीच फुटाणे दिले. हे पाहून चाणक्य अथर्व त्याला ताबडतोब जाब विचारला ,"तुम्ही मला कमी का फुटाणे दिले?"
फुटाणेवाला लबाडीने म्हणाला ,"तुला न्यायला सोपे जावे म्हणून."
अथर्वने पटकन काही थोडेच पैसे फुटाणे वाल्याचा हातावर ठेवले. आणि तो जाऊ लागला.
फुटाणे वाल्याने पैसे मोजले. ते कमी होते. त्याने अथर्वला परत बोलावले. फुटाणेवाला म्हणाला "तू मला कमी पैसे दिलेस."
अथर्व चतुरपणे म्हणाला ,"अहो तुम्हाला ते मोजायला सोपे नाही का पडणार?" असे म्हणत अथर्व तेथून निघून गेला.
तात्पर्य
व्यवहारात हजरजबाबी असावे.