⚜️शहीद सरदार भगतसिंग⚜️
भगतसिंग यांचा जन्म पंजाब मधील कल्याणपूर जिल्ह्यातील बंगा या गावी 28 सप्टेंबर 1907 साली झाला. वडिलांची शेती होती. वडील किशन सिंग हे क्रांतिकारी विचारांचा, ग्रंथांचा प्रसार करीत होते. त्यामुळे त्यांना मंडालेच्या तुरुंगात सजा भोकावे लागली होती.
भगतसिंग यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बंगा येथे झाले. 1923 मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. मित्रांना घेऊन 'नवजवान भारत सभा' नावाची एक संस्था उभी केली. त्यांच्या मनात सदैव देशाच्या स्वातंत्र्याचा विचार सुरू असे.
1919 साली महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यांच्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजवर बहिष्कार घातला. 1922 साली महात्माजींनी आपली चळवळ मागे घेतली. त्यामुळे तरुणवर्गात नैराश्य पसरले. भगतसिंग यांना कळून आले की अहिंसेच्या मार्गाने इंग्रज लोक ऐकणार नाहीत. त्यासाठी शस्त्रे हातात घेऊन क्रांती केली पाहिजेक
पुढील काही वर्ष ते जन्म माणसांचा विचार घेण्यासाठी देशात फिरले. लोकांची दुःखे पाहिली. इंग्रज लोक भारतीयांशी कसे वागतात याची त्यांना जाणीव झाली. शास्त्रे गोळा करण्यासाठी त्यांनी पैसे जमवले. 9 फेब्रुवारी 1925 च्या रात्री लखनऊ जवळच्या काकोरी स्टेशन मधून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक आगगाडी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन लुटली. त्यातील सर्व संपत्तीचा उपयोग शस्त्रे विकत घेण्यासाठी, बॉम्ब तयार करणे अदीकार्यासाठी करण्यात आला.
3 फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या राज्यसत्तेने सायमन कमिशन भारतात पाठवले. मुंबईत या कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला. गो बॅक सायमन अशा घोषणा देण्यात आल्या. काळी निशाणी दाखवण्यात आली. 1928 रोजी हे कमिशन पंजाबात लाहोर मध्ये आले. तेथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली.
इंग्रज सरकारने देखील अतिशय संतापलेले होते. त्यांनी बेदम लाठीमार केला. लाला लजपतराय यांच्यावर काठीचा प्रहार करण्यात आला. त्यामुळे ती आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लाला लजपत राय यांच्या मृत्यूस डी एस पी सँण्डर्स जबाबदार आहे अशी भगतसिंगांची ठाम धारणा बनली. व कोणत्याही परिस्थितीत सँण्डर्सला मारायचेच अशी प्रतिज्ञा करून भगतसिंगांनी त्यांची त्याची पूर्तता केली.
त्यानंतर 'डिस्प्युट बिल' व 'पब्लिक सेफ्टी बिल' हे दोन अन्यायी कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानापुढे आणण्यात आले. त्यावेळी प्रेक्षक गृहात कमी शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आला. ब्रिटिश सरकारच्या धिक्काराची पत्रके सर्वत्र भिरकावण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश सरकारला गोंधळून टाकले; त्यामुळे सरकार घाबरले.
ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूला पकडले. त्यांच्यावर खटले भरून न्यायालयाच्या नियमाप्रमाणे लाहोरच्या तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली. त्यावेळी त्यांनी इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत हसत हसत फाशीचा स्वीकार केला हा दिवस भारतात 'शहीद दिन' म्हणून साजरा केला जातो.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
🎗️ महत्त्वाचे मुद्दे 🎗️
⚜️ भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी बंगा या गावी झाला ( सध्या पाकिस्तानात आहे)
⚜️ वडिलांचे नाव ~ किशन सिंग व आईचे नाव ~ विद्यावती
⚜️ भगतसिंग यांचे कुटुंब आर्य समाजाच्या विचारांवर चालणारे होते.
⚜️ जालियनवाला बाग हत्याकांड 1919 ने त्यांच्या मनावर व विचारांवर सखोल परिणाम झाला.
⚜️ 1923 मध्ये त्यांचे इंटरमिजिएट शिक्षण पूर्ण केले.
⚜️ भारताच्या स्वातंत्र्यासाठी 1925 मध्ये त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील शिक्षण सोडून 'नवजवान भारत सभा' ही संस्था स्थापन केली
⚜️ काकोरी कटातील रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह 4 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली. यामुळे उद्विग्न होऊन ते चंद्रशेखर आजाद यांच्या 'हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन' या संस्थेबरोबर जोडले गेले. या संस्थेचे नवीन नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे 1928 मध्ये केले गेले.
⚜️ सायमन कमिशनला शांततेने विरोध करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास ठार करण्यासाठी भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू यांनी योजना आखली व अमलात आणली. या योजनेत सँन्डर्स तत्कालीन लाहोर पोलीस उपअधीक्षक 17 डिसेंबर 1928 ला ठार झाला.
⚜️ भगतसिंग यानंतर कलकत्ता येथे गेले असता त्यांची क्रांतिकारी जतींद्रनाथ दास यांच्याशी ओळख झाली. जतींद्रनाथ दास व भगतसिंग यांनी आग्रा येथे बॉम्ब बनवण्याचा कारखाना काढला.
⚜️ कामगारांच्या हक्कावर बाधा आणणारे 'ट्रेड डिस्प्युट बिल' व देशभक्तांचा आवाज दडपणारे 'पब्लिक सेफ्टी बिल' ही दोन विधायके केंद्रीय कायदेमंडळात ब्रिटिश सरकार मांडणार होते. त्यांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात 8 एप्रिल 1929 ला बॉम्बस्फोट केला व पत्रके टाकली. यावेळी त्यांनी भारत माता की जय व इन्कलाब जिंदाबाद या घोषणा दिल्या. स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले.
⚜️ त्यांना अटक केली गेली व कारागृहात डांबले गेले. कारागृहात भगतसिंग व सहकाऱ्यांनी 64 दिवस उपोषण केले. यात जतिंद्रनाथ दास यांनी प्राणत्याग केला.
⚜️ कारागृहात भगतसिंग यांनी ' नास्तिक क्यो हूँ ' चे लिखाण केले.
⚜️ सँडर्स खुणात दोषी ठरवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली.
⚜️ 23 मार्च 1931 ला या महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत हसत हसत ते तिन्ही भारत मातेचे सुपुत्र फसावर गेले व शहीद झाले. हा दिवस 'शहीद दिन' म्हणून पाळला जातो.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
क्रांतिकारक भगतसिंग यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.
👇
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️