SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, December 7, 2024

NMMS Admit Card 2024-25 OUT for Maharashtra Download NMMS Hall Ticket Here...

 NMMS Admit Card 2024-25 OUT for Maharashtra Download NMMS Hall Ticket Here... 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर, २०२४

NMMS ADMIT CARD 


                महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) प. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७४४ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३,४५७ शाळा व एकूण २,४८,३२२ विद्याथ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

                    परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.inhttps://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ७ डिसेंवर २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत, सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल .

                 सदर प्रवेशपत्रात विद्याथ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती अगल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्तो करण्यासाठी दि. २१.१२.२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अमांचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⚜️ NMMS प्रवेश पत्र प्राप्त करण्यासाठी ~ CLICK HERE


⚜️ NMMS प्रवेश पत्र प्राप्त करण्यासाठी ~ CLICK HERE





माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा