शाळेतील दिनांक ३०/९/२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी करून संचमान्यतेसाठी विचारात घेणेबाबत..
![]() |
विद्यार्थी पडताळणी |
विषय - शाळेतील दिनांक ३०/९/२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी करून संचमान्यतेसाठी विचारात घेणेबाबत..
संदर्भ - १) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचनालय म.रा. पुणे यांचे दिनांक २३/९/२०२४ रोजीचे पत्र
२) मा. शिक्षण संचालक यांनी VC द्वारे दिलेल्या सूचना दि. २४/९/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टल असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२३- २०४ ची संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे.
२) तथापि, विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणांस्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन २०२३-२४ च्या मंजूर पदांवर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्याच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबधित गट शिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणी मध्ये नियमित असलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील वावींची खात्री करण्यात येईल.
१) नाव, लिंग किंवा जन्म तारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या वावतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असलेली खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहनिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात येईल.
२) ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाहीत याची शहनिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात येतील
३) शाळेतील विद्यार्थी डूप्लीकेट असल्याचे स्टुडंट पोर्टल वर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करण्यात येईल.
४) शाळेकडून अर्ज प्राप्त झाल्यास प्रत्येक शाळेस संबधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख समक्ष भेट देतील व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात येईल. मुख्याध्यापकांनी अर्ज केलेले प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी
५) ज्या शाळांची किमान ९० % विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत त्याच शाळातील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात येईल
६) आधार Invalid / Unprocessed /आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित असल्याचे विविध बाबी लक्षात घेवून खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
७) विद्यार्थी पडताळणी झाल्यानंतर संबधित विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख हे विद्यार्थी सांख्यिकी माहितीचे प्रमाणपत्र Online Upload करतील त्यानंतर संबधित गट शिक्षणाधिकारी हे दिनांक ७/१०/२०२४ पर्यंत त्यांच्या login वर सदर विध्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेवून संच मान्यतो सन २०२३-२४ करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment