सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा 2025~26
सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे सुरू झाले.
फॉर्म भरणे दिनांक 10 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा 2025~26
सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे सुरू झाले.
फॉर्म भरणे दिनांक 10 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप
घटकांनसार टेस्ट ( PDF)
घटकांनुसार टेस्ट (PDF ) DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
सौजन्य ~ राहुल नारायणराव तुंगावकर
तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
तुम्हाला जर स्कॉलरशिपच्या ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)
विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर, २०२५ अधिसूचना.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक १२ सप्टेंबर, २०२५ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सोबतः माहितीपत्रक
माहितीपत्रक DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
केंद्रप्रमुखांबाबतचा शासन निर्णय दि.२९-८-२०२५ नुसार केंद्रप्रमुखांची रिक्तपदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत
केंद्रप्रमुखांबाबतचा शासन निर्णय दि.२९-८-२०२५ नुसार केंद्रप्रमुखांची रिक्तपदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भ क्र.७/दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्व्ये केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या संवर्गातील पदांसाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना दि. १८/७/२०२५ मध्ये अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा या मार्गांनी ५०:५० या प्रमाणात भरावयाची आहेत. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दि.२८/८/२०२५ अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या संवर्गातील पदोदिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत. शासन निर्णय दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील ३ (ब) (vi) नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळविणेबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत. सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावयाची असल्याने खालील विवरणपत्रात केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबतची माहिती प्रमाणित करून दोन दिवसात संचालनालयास सादर करण्यात यावी.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
शिक्षक दिन
5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी "शिक्षक दिन" भाषणांच्या पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
सौजन्य ~ कृष्णा निवृत्ती साळी सर
शिक्षक दिन भाषणाच्या PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
विविध प्रकारची गणपती स्केच
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
सौजन्य ~ कृष्णा निवृत्ती साळी सर
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
गणपतीचे सोपे चित्र कसे काढावे. चित्र काढण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
गणपती चित्र
गणपती चित्र रंगभरण करण्यासाठी पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
200 हून अधिक विविध प्रकारची गणपती स्केच
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
सौजन्य ~ कृष्णा निवृत्ती साळी सर
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
गणपतीचे सोपे चित्र कसे काढावे. चित्र काढण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
गणपती चित्र
गणपती चित्र रंगभरण करण्यासाठी पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
गणपतीचे सोपे चित्र कसे काढावे. चित्र काढण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
नवोदय विद्यालय
नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर करेक्शन विंडो ओपन करण्यात आलेली आहे
आपण भरलेला फॉर्म चा एप्लीकेशन नंबर व जन्मतारीख टाकून आपण आपल्या विद्यार्थ्यांची जर एखादी करेक्शन करायचे असेल तर ती करेक्शन करू शकता
यामध्ये लिंग अपंगत्व कॅटेगर व परीक्षेचे माध्यम या गोष्टी आपण बदलू शकता
अंतिम मुदत 30 ऑगस्ट
आपणास काही करेक्शन करायचे असेल तर खालील चित्राला टच करून आपण एप्लीकेशन नंबर व जन्मतारीख टाकून करेक्शन करू शकता.
करेक्शन विंडो च लिंक वर जाण्यासाठी खालील चित्राला टच करा
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
तुम्हाला जर नवोदय विद्यालयाच्या ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
गणपती सुट्टीतील अभ्यास इयत्ता पहिली ते चौथी
सौजन्य ~ श्री कृष्णा निवृत्ती साळी (भिवंडी ठाणे)
अभ्यासाचे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रांना टच करा.
इयत्ता ~ पहिली
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
इयत्ता ~ दुसरी
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
इयत्ता ~ तिसरी
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
इयत्ता ~ चौथी
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
पहिली ते सातवी
आकारिक चाचणी नमुना पेपर
सौजन्य
शिक्षकमित्र समूह नगर
फक्त इयत्ताना टच करून आपण पेपर डाउनलोड करू शकता.
इयत्ता पहिली, दुसरी इंग्रजी पेपर
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
महागाई भत्ता फरक
53% वरून 55% महागाई भत्ता वाढ करण्यात आलेली आहे महागाई भत्ता फरक काढण्यासाठी आपण खालील कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता .
✳️जानेवारी ते जून चे बेसिक टाकावे
✳️जुलै चे बेसिक टाकावे
व आपणास मिळणारा एकूण फरक पहावा.
फरक काढण्यासाठी खालील चित्राला टच करा.
सौजन्य ~ शेखर पाटील सर
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
रक्षाबंधन
![]() |
रक्षाबंधन निबंध |
सणाची माहिती
रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते.
भाऊ - बहिणीच्या या प्रेमाला उधाण येत ते राखी पौर्णिमेला. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी आठवणीने राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन खूश करत असतो. या दिवशी श्रावणी करणे हा प्रकार असतो. श्रावणी करणे म्हणजे मन शुद्ध करणे.
बहीण भावाचे नाते दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांवरील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 09 फेब्रुवारी, 2025
अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार दि. ०१ जुलै, 2025 रोजी सायं 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.
दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 25/04/2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. 25/04/2025 ते 04/05/2025 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
अंतिम निकाल प्राप्त करणे -
सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्याथ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत
त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.
संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक
माहितीच्या Links खालीलप्रमाणे-
1. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)
2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय)
3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)
4. संचनिहाय कटऑफ (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)
विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.
गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.
1. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी.
2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.
3. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.
4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.
5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.
गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत -
परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 25 एप्रिल, 2025 रोजी व अंतिम गुणपत्रक व प्रमाणपत्र दि. ०१ जुलै, 2025 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे.
1. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रक व प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळेने त्याची उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरीत करावी तसेच डिजिटल प्रतीची सॉफ्ट कॉपी मागणीनुसार उपलब्ध करून द्यावी.
2. गुणपत्रकाची डिजिटल प्रत देण्यात आलेली असल्याने छापील गुणपत्रक वितरीत केले जाणार नाही.
3. शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती कायम स्वरूपी जतन करुन ठेवाव्यात व विद्यार्थी / पालकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. केवळ शिष्यवृत्तीधारक व राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची रंगीत छापील प्रमाणपत्रे यथावकाश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांचेमार्फत संबंधित शाळांना उपलब्ध करुन दिले जातील.
महत्त्वाचे
1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्हता रद्द केली जाईल.
3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार सदर कार्यालयाकडेच करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी पत्ता खालीलप्रमाणे
मा. शिक्षण संचालक (योजना)
शिक्षण संचालनालय योजना,
17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे - 411 001.
फोन - 020-26126726
ईमेल - directorscheme.mh@gmail.com
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
अंतिम निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
योग दिन
21 जून
शाळेमध्ये तसेच विद्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी बुकलेट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा
योग दिन घोषवाक्य
योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती
जो करेल योग,
त्यापासून दूर राही रोग!!!!
योग असे जेथे;
रोग नसे तेथे....
योग असे जेथे.
आरोग्य वसे तेथे.....
स्वयं को बदलो, जग बदलेगा।
योग से सुखमय हर दिन खिलेगा।।
योग है स्वास्थ्य के लिए क्रांति।
नियमित योग से जीवन मे हो सुख शांति ।।
जिसने योग अपनाया।
रोग को हमेशा के लिए दूर भगाया।।
रोगमुक्क्त जीवन जीने की हो चाहत।
नियमित योग करने की डालो आदत ।।
स्वास्थ्य जीवन जीना जिंदगी की जमा पूँजी।
योग करना रोगमुक्क्त जीवन की कुंजी।
योग है स्वास्थ्य के लिए लाभकारी।
योग रोगमुक्क्त जीवन के लिए गुणकारी।।
इयत्ता 4 थी इयत्ता 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक २६/०३/२०२५ अंतिम निकालाबाबत.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सातारा जिल्हा परिषद यांचे वतीने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या इ. 4 थी व इ. 7 वी च्या विद्याथ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा ही दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती. या परिक्षेचा अंतरिम निकाल दिनांक 29/04/2025 रोजी जाहिर करण्यात आला होता.
दिनांक 02/05/2025 रोजी पर्यंत आलेले आक्षेप विचारात घेऊन अंतिम निकाल आज दिनांक 06/06/2025 रोजी जाहिर करण्यात येत आहे.
https://www.eduzpsatara.com/Home/Result
या संकेतस्थळावर भेट देवून निकाल पाहून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. यायावत संबधित विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे.
निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
कराड तालुका
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫