केंद्रप्रमुखांबाबतचा शासन निर्णय दि.२९-८-२०२५ नुसार केंद्रप्रमुखांची रिक्तपदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत
केंद्रप्रमुखांबाबतचा शासन निर्णय दि.२९-८-२०२५ नुसार केंद्रप्रमुखांची रिक्तपदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भ क्र.७/दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्व्ये केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या संवर्गातील पदांसाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना दि. १८/७/२०२५ मध्ये अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा या मार्गांनी ५०:५० या प्रमाणात भरावयाची आहेत. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दि.२८/८/२०२५ अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या संवर्गातील पदोदिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत. शासन निर्णय दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील ३ (ब) (vi) नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळविणेबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत. सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावयाची असल्याने खालील विवरणपत्रात केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबतची माहिती प्रमाणित करून दोन दिवसात संचालनालयास सादर करण्यात यावी.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
No comments:
Post a Comment