⚜️ आषाढी व कार्तिकी एकादशी ⚜️
संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशा येतात, प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादशा जास्त येतात. कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशी मध्ये आषाढी एकादशीला जास्त महत्त्व आहे. या महिन्यात हवामान पावसाळी असते. याच महिन्यात पाऊस जास्त पडतो. आषाढी एकादशीस शयनी व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकादशी म्हणतात.
आषाढी एकादशीला महाएकादशी म्हणतात. भागवत धर्मानुयायी वारकरी पंथात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपानदेव, निवृत्तिनाथ, एकनाथांच्या पालख्या व दिंड्या चंद्रभागेच्या काठी येतात. तेव्हा त्याला जत्रेचे स्वरूप येते. पंढरपूर म्हणजे भागवत धर्माचे आदिपीठ आहे. या पंढरपुरात भगवान गोपालकृष्णाचे विठ्ठलरूप मानण्यात येते. विठ्ठल भीमातीरी भक्तांच्या भेटीसाठी कायम उभा असतो. ग्यानबा तुकारामाच्या गजरात पंढरी दुमदुमते. दिंड्या-पताकांचे भार वाळवंटात उतरतात. संतांची मांदियाळी भरते. सारा आसमंत हरिनामाच्या गजराने भरून जातो.
अशा या विविध सणांमुळेच भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.