⚜️ गुढीपाडवा माहिती ⚜️
सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो; हिंदू धर्मीयांच्या नववर्षाला प्रारंभ होतो. आनंदाप्रीत्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणरा सण 'गुढीपाडवा'.
गुढीपाडवा (वर्षप्रतिपदा' हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या महिन्यात हवेतील गारवा कमी झालेला असतो. व उन्हाळ्याला प्रारंभ होतो. त्यामुळे सुरुवातीच्या या उन्हाळ्यााला तीव्रता नसते. या दिवशी पहाटे लवकर उठून मन व शरीर प्रसन्न करण्यासाठी प्रातर्विधी उरकून स्नान केले जाते. घरातील देवांच्या पूजेबरोबर, हा सण ज्या वारी आला आहे, त्या वाराच्या आधिपतीची पूजा केली जाते.
पूर्वी गुढी उभरण्यासाठी चांदीचा कलश व जरी वस्त्र वापरले जात. आजसुद्धा ही प्रथा आहे. आता वस्त्राच्या ऐवजी भगवा झेंडा काठीला बांधून, त्यावर गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून, त्यावर फुलांची भरगच्च माळ, साखरमाळ बांधतात. व गुढी तुळशी-वृंदावनाच्या बाजूला बांधली जाते. या दिवशी कडुलिंबांच्या कोवळ्या पानात, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गूळ घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर घरातील सर्वांना हा प्रसाद म्हणून दिला जातो. या प्रकारे शुभ कृत्यांचा मगल मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.