SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label जिल्हाअंतर्गत बदली. Show all posts
Showing posts with label जिल्हाअंतर्गत बदली. Show all posts

Saturday, March 29, 2025

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.



विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत आपणांस खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-

(अ) जिल्हांतर्गत बदली :-

           १) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ करीता, जे शिक्षक दि. ३० जून २०२५ रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे.

            २) सन २०२२ मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन २०२२-२३ मध्ये बदली झाली नव्हती, अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अनु. क्र. १.७.२ येथील तरतुदीनुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी.

तसेच या विभागाच्या पत्र क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ मधील अनु.क्र. १ येथे नमुद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्र.७करीता बदली पात्र होणार नाहीत. 

           ३) सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी.

             ४) अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्र. ७ राबविण्यात यावा. तथापि, त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागानिश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

             ५) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीपात्र ठरविण्यात यावे .

(ब) आंतरजिल्हा बदली :-

                 १) सन २०२५ या वर्षात नविन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमुद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १० टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथील करण्यात येत आहे. तथापि, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी नविन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील.

                २) आंतरजिल्हा बदलीसाठी दि.३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात. तसेच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा


Friday, February 28, 2025

जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक 7 नोव्हेंबर 2024

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक

परिपत्रक ~ 7 नोव्हेंबर 2024 



महोदय,

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे राबविण्यात येते.


२. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र.२१६/२०२४ वरील दि.२५.१०.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित (functional) असावे, असे निदेश दिलेले आहेत.


३. तद्नुषंगाने आपणांस असे कळविण्यात येते की, यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.

४. तद्‌नंतर खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावीः-


५. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात


यावी. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.


६. सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहील. उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरु ठेवणेबाबतची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा.लि. पुणे यांची राहील.


७. तथापि, एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रीया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी.


परिपत्रक -28 फेब्रुवारी 2025 

CLICK HERE 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


अंतर जिल्हा बदली 2024-25 28 फेब्रुवारी 2025 चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी 

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


13 जानेवारी 2025 चे परिपत्रक पाहण्यासाठी~ क्लिक HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा