SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label दिनदर्शिका. Show all posts
Showing posts with label दिनदर्शिका. Show all posts

Sunday, September 11, 2022

दिनदर्शिका

 ⚜️  दिनदर्शिका ⚜️



✍️ एका आठवड्यात सात दिवस असतात.

 ✍️ आठवड्याचे वार ~      रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार.

✍️ 1 , 8 , 15 , 22 , 29 समान वार येतो.

✍️ 28 दिवसांच्या महिन्यात सात ही वार 4 वेळा येतात.

✍️ 29 दिवसांच्या महिन्यात 1 तारखेचा वार 5 वेळा येतो.

✍️ 30 दिवसाच्या महिन्यात 1 व 2 तारखेचा वार 5 वेळा येतो.

✍️ 31 दिवसांच्या महिन्यात 1 , 2  व 3 तारखेचा वार 5 वेळा येतो.

⚜️ एका वर्षात बारा महिने असतात.

✍️ वर्षाचे 12 महिने ~ जानेवारी , फेब्रुवारी , मार्च , एप्रिल , मे , जून , जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर .

✍️ 31 दिवसांचे महिने 7 असतात.

👉 जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोंबर, डिसेंबर.

✍️ 30 दिवसांचे 4 महिने असतात.

👉 एप्रिल , जून , सप्टेंबर , नोव्हेंबर.

✍️ 28 किंवा 29 दिवसांचा एक महिना असतो.

👉 फेब्रुवारी

⚜️वर्षाचे दोन प्रकार पडतात⚜️


💠 सर्वसाधारण वर्ष .

💠 लीप वर्ष .


⚜️ सर्वसाधारण वर्ष ⚜️


✍️ सर्वसाधारण वर्षांमध्ये 365 दिवस असतात.

✍️ सर्वसाधारण वर्षांमध्ये 52 आठवडे 1 दिवस असतो.

✍️ सर्वसाधारण वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात.

✍️ सर्वसाधारण वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो, तोच वार 31 डिसेंबरला असतो.

✍️ उदाहरण ~ 1 जानेवारीला सोमवार असेल, तर 31 डिसेंबरला सोमवारच असतो.

✍️ सर्वसाधारण वर्षांमध्ये 1 तारखेचा वार 53 वेळा येतो व इतर 6 वार 52 वेळा येतात.


⚜️ लीप वर्ष ⚜️


🔖 लीप वर्ष कसे ओळखावे ?

✍️ ज्या वर्षाला 4 ने नि:शेष भाग जातो ते लीप वर्ष होय, पण शतक वर्ष असेल तर त्या वर्षाला 400 ने नि:शेष भाग जावयास हवा.

✍️ उदाहरणार्थ ~ 1988 , 1995 , 1996 अशा वर्षांना 4 ने नि:शेष भाग जात असेल तर ते लीप वर्ष समजावे, तसेच 1700 , 1800 , 1900 अशा वर्षांना 400 ने नि:शेष भाग जात असेल तर लीप वर्ष समजावे.

✍️ लीप वर्षांमध्ये 366 दिवस असतात.

✍️ लीप वर्षांमध्ये 52 आठवडे 2 दिवस असतात.

✍️ लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात.

✍️ लीप वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो,  त्यापुढील वार 30 डिसेंबरला असतो.

✍️ उदाहरण ~ 1 जानेवारीला सोमवार असेल, तर 31 डिसेंबरला मंगळवार असतो.

✍️ लीप वर्षांमध्ये 1 व 2 तारखेचा वार 53 वेळा येतो. व इतर 5 वार 52 वेळा येतात.

⚜️ एकाच वर्षात लोकमान्य टिळक पुण्यतिथी , स्वातंत्र्य दिन , शिक्षक दिन व बालदिन एकाच वाराला येतात.

⚜️ महाराष्ट्र दिन , महात्मा गांधी जयंती , नाताळ एकाच वाराला येतात.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

दिनदर्शिका हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

⚜️ स्पर्धा परीक्षेसाठी एका वर्षांमधील महत्त्वाचे दिनविशेष पाहायचे असतील तर खालील व्हिडिओ पहा.

👇

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️