SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label पवित्र पोर्टल. Show all posts
Showing posts with label पवित्र पोर्टल. Show all posts

Friday, October 11, 2024

पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

 पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.



विषयः- पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

संदर्भ:-१. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६६६/टिएनटी-१, दि.१०/०९/२०२४. २. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडील दि.१३.०९.२०२४ रोजीची पत्र.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. (प्रत संलग्न) 

                  १. भरती प्रक्रीयेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहीलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रीयेचाच एक भाग आहे. यानुसार या पूढील सर्व भरती प्रक्रीयेमध्ये अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरुन सदर रिक्त पदे नव्याने येणा-या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील.

                   २. शासन निर्णय दि.१०/११/२०२२ मधील तरतूदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुस-या टप्प्यातील जाहिराती घेवून पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्यावत बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत फळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे.

                     ३. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ राज्यात दिनांक २६/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. त्यअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेवून नवीन येणा-या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेवून प्रवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.

                       पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने, सदरची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.

 सोबतः-संदर्भीय पत्र

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.





Saturday, September 14, 2024

पवित्र पोर्टल दुसरा टप्पा

 पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत

पवित्र पोर्टल

विषय :- पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत


संदर्भ :- शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्रक्र ६६१/टिएनटी-१ दिनांक १०/०९/२०२४


संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत, त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. (प्रत संलग्न)


१. बिंदूनामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून १० टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे)


२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचाच एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणा-या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील.


३. शासन निर्णय दि.१०/११/२०२२ मधील तरतुदींनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्यातील जाहिराती घेवून पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे.

४. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दिनांक २६/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेवून नवीन येणाऱ्या जाहिरातींमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता आरक्षण विचारात घेवून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.


पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने, सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापुर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्हाला जर सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करायचे असेल तर खालील चित्राला टच करा.



Saturday, April 20, 2024

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

 शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक पद भरती बाबत प्रसिद्धपत्रक


⚜️ पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

⚜️ त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.

⚜️ दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.

⚜️ तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.

⚜️ यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे.

त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.

🎗️ सर्व जिल्हा निहाय प्रवर्गनिहाय निवड यादी पाहण्यासाठी - CLICK HERE

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर प्रेस नोट ची PDF DOWNLOAD करण्यासाठी चित्राला चेक करा.



Monday, February 26, 2024

पवित्र पोर्टल

 निवड याद्या जाहीर...

🔖सर्वसाधारण निवड यादी, सर्व जिल्हे
🔖इतर प्रवर्ग निहाय निवड याद्या
🔖Other reservation list

( सर्व जिल्हा निहाय,प्रवर्ग निहाय व रिझर्वेशन निहाय निवड याद्या *pdf* उपलब्ध *All in One*) 👇🏻