SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label बदली अपडेट. Show all posts
Showing posts with label बदली अपडेट. Show all posts

Friday, April 4, 2025

विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.

 विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.



विषय :- विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.

संदर्भ :-

१) शासन परिपत्रक क्र. जिपब-४८१९/प्र.क्र.१९६/आस्था-१४, दि.२१.२.२०१९

२) शासन पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४, दि.२३.११.२०२२.

३) शासनाचे समक्रमांकित दि.२.४.२०२५ रोजीचे पत्र.


महोदय,

उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाचे दि.२३.११.२०२२ रोजीचे पत्र रद्द करुन, शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२.४.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे.

२. उपरोक्त दि.२.४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक- भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरीता विद्यमान शाळेतील ३ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.

उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी व त्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याची आपणांस विनंती आहे.



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा