⚜️ मोहरम ⚜️
महंमद पैगंबरांना हिरा पर्वतावर साक्षात्कार झाला, तो काळ फार संकटाचा होता. सामान्य जनता सत्ताधाऱ्यांच्या जुलमामुळे हैराण झाली होती. हैराण झालेले लोक मनातून देवाचा धावा करीत होते. न्याय व नीतिमत्ता यांना दुष्ट लोकांचे ग्रहण लागले होते. अशावेळी सामान्य जनांचे रक्षण करण्यसाठी परमेश्वर अवतार घेतो, अशी भावना होती. महंमद पैगंबरांना साक्षात्कार झाला, परंतु ते स्वतःला परमेश्वराचा अवतार समजत नव्हते. तर प्रेक्षित समजत होते. त्यांनी ईश्वरवादाचा प्रचार केला. हळूहळू हा प्रचार वाढत गेला. विस्कळीत झालेला समाज एकत्र येऊ लागला.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नवव्या व दहाव्या दिवशी उपवास केला जातो. तेव्हा पाण्याचा थेंबही प्यायचा नसतो, हा उपवास सकाळी पाच वाजता सुरू होऊन संध्याकाळी सात वाजता संपतो. दहाल्या दिवशी हसन व हुसेन यांची प्रतिकृती बनवून त्यांचे दफन केले जाते. (म्हणजे तलावात त्या प्रतिकृतीचे विसर्जन केले जाते.) सात दिवस चालणान्या लढाईत ह्या दोघाना पाणी व जेवन सुद्धा दिले नाही, म्हणून त्या दिवशी सर्वांना सरबत वाटले जाते, गोर- गरिबांना अन्नदान केले जाते.
अशा या विविध सणांमुळेच भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.