यशवंतराव चव्हाण चारोळ्या
यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील भाषण व निबंधासाठी उपयुक्त अशा चारोळ्या.
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री उभा राहिला !
त्याचा पराक्रम साच्यऱ्या जगाने पाहिला !!
देशवासीयांच्या मनी गुंजते एकच नाव !
ते म्हणजे यशवंतराव यशवंतराव !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्राचा सुपुत्र देशाचा अभिमान
ज्यांनी वाढविला मराठी मातीचा सन्मान !
त्या यशवंतराव चव्हाण यांचे
मी काय गाऊ गुणगाण !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सह्याद्रीचे कडेपठार भीमा,
कृष्णा प्रितीसंगम यशवंतराव तुमचेच गीत गाती !
भाग्यवान आम्ही की
तुमच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गोरगरीब जनतेचे कैवारी
नेत्याचे ही नेते !
यशवंतराव चव्हाण होते
महाराष्ट्राचे भाग्यविधाते !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.