SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label यु-डायस प्लस. Show all posts
Showing posts with label यु-डायस प्लस. Show all posts

Wednesday, February 12, 2025

यु-डायस प्लस मध्ये अंतिम मुदतवाढ देणे बाबत

 यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १४/०२/२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देणेबाबत.

यु-डायस प्लस मध्ये मुदतवाढ


विषयः यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १४/०२/२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देणेबाबत.


संदर्भ : जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार.


सन २०२४-२५ या वर्षांमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे सर्व काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १०/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. या कार्यालयास ई-मेल व दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.


यासंदर्भात आपणास कळविण्यात येत, की यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २ री ते इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने दि. १४/०२/२०२५ पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ घेण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ नोंदणी करण्यासाठी कळविण्यात यावे. यानंतर केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देता येणार

नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा, जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


यु-डायस प्लस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असतील तर तात्काळ विद्यार्थी पटसंख्येसह अहवाल या कार्यालयास दि. १४/०२/२०२५ पर्यंत सादर करावा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

,

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



Wednesday, September 25, 2024

यु डायस प्लस मध्ये APAAR आयडी तयार करणेबाबत

 यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.



विषयः यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

संदर्भ : भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी तयार करून घेण्याकरिता कळविले आहे. APAAR आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु-डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.

यु-डायस प्लस प्रणालीमधून APAAR आयडी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.

APAAR आयडी उपयोगिता :-

⚜️ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

⚜️ APAAR आयडी हा १२ अंकी असून एकमेव असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे.

⚜️ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR आयडी Generate होतील.

⚜️ APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OOSC) मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे, इ. बाबीं डिजिटल नियंत्रित करण्यात येतील.

⚜️ APAAR आयडी तयार झाल्यानंतर Digi locker ला जोडण्यात येणार आहे. Digi locker ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांने शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेचे निकाल, holistic report card and extracurricular accomplishments ऑनलाईन पध्दतीने बघता येईल.

⚜️ APAAR आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल.

⚜️ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर Graphical Analysis करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील.

जबाबदारी :-

⚜️ महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे Nodal Officer असणार आहेत.

⚜️ APAAR आयडी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील MIS-Coordinator, जिल्हा स्तरावरील Coordinator यांचे APAAR आयडी Creation बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

⚜️ शाळा स्तरावर APAAR आयडी Create करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी Parent Teacher Meeting आयोजित करून Consent by Father/Mother/Legal Guardian of Student for APPR ID Generation हा फार्म भरून घेवून पुढील कार्यवाही करावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना https://apaar.education.gov.in/resource या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

⚜️ यु-डायस प्लस प्रणाली व विद्या समिक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये APAAR आयडी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे.

⚜️ APAAR आयडी तयार करणे व वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना APAAR आयडीबाबत संकेत स्थळांवरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

⚜️ केंद्र शासनाने APAAR आयडी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी https://apaar.education.gov.in/ हे पोर्टल विकसित केले आहे व १८००-८८९-३५११ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

⚜️ सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले संदर्भिय पत्र.

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सदर परिपत्रकाची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.