SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label रोमन संख्याचिन्हे. Show all posts
Showing posts with label रोमन संख्याचिन्हे. Show all posts

Saturday, October 1, 2022

गणिती संकल्पना ~ रोमन संख्याचिन्हे

  ⚜️ रोमन संख्याचिन्हे⚜️



⚜️ संख्यांसाठी आपण काही चिन्हे वापरतो. वेगवेगळ्या लिपीमध्ये वेगवेगळी संख्याचिन्हे वापरली जातात. त्यापैकी रोमन संख्या चिन्हांचा आपण या ठिकाणी विचार करू.

⚜️ अनेक वर्षांपूर्वी युरोपमध्ये अशी चिन्हे वापरली जात होती. त्यांना 'रोमन संख्याचिन्हे' म्हणतात.

⚜️ रोमन संख्यांमध्ये अंकांऐवजी इंग्रजी अक्षरांचा वापर करण्यात आलेला आहे.

⚜️ रोमन संख्या चिन्हात खालील सात संख्या चिन्हांचा वापर केला जातो.

❇️ रोमन संख्याचिन्हे व त्याची किंमत

⚜️ I   👉  1

⚜️ V  👉  5

⚜️ X  👉  10

⚜️ L  👉  50

⚜️ C  👉  100

⚜️ D  👉  500

⚜️ M  👉  1000

{ I , V , X , L ,C , D , M } 

💠 या पद्धतीत शून्यासाठी चिन्ह नाही.

म्हणजेच रोमन संख्या चिन्हात शून्य अंकासाठी कोणतेही चिन्ह वापरत नाहीत

💠 दशमान संख्या लेखन पद्धतीप्रमाणे स्थानिक किमतीचाही वापर केला जात नाही .

म्हणजेच आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या प्रमाणे अंकांच्या स्थानावरून त्याची किंमत ठरते. त्याप्रमाणे रोमन संख्यांमध्ये रोमन अक्षरांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नाही.

⚜️ रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचे काही नियम आहेत.


 💢 पहिला नियम 👉

I व X यापैकी एखादे संख्या चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते

उदाहरण

1}  III 👉 1 + 1 + 1 = 3

2}  XXX 👉 10 + 10 + 10 = 30

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


💢 नियम दुसरा 👉

I व X ही संख्या चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात परंतु V हे संख्या चिन्हे एकापुढे एक लिहीत नाहीत.

उदाहरण

1}  III 👉 1 + 1 + 1 = 3 { लिहू शकतो }

2}  XXX 👉 10 + 10 + 10 = 30 { लिहू शकतो }

            परंतु

3}  VV 👉 5 + 5  = 10 { लिहू शकत नाही}

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


💢 नियम तिसरा 👉

I हे संख्या चिन्ह V किंवा X यापैकी एखाद्या मोठ्या संख्येची संख्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते.

उदाहरण

1}  XI 👉 10 + 1  = 11 

2}  VI 👉 5 + 1  = 6 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


💢 नियम चौथा 👉

I हे संख्या चिन्ह V किंवा X संख्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत V वी X एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र I हे संख्याचिन्ह V किंवा X च्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहीत नाहीत.

उदाहरण

1}  IX 👉 10 - 1  = 9 

2}  IV 👉 5 - 1  = 4 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


⚜️काही उदाहरणे⚜️


प्रश्न  👉 76 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल?

उत्तर 👉 LXXVI


प्रश्न  👉 L हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरले जाते?

उत्तर 👉 50


प्रश्न  👉 IV गुणिले VIII = किती?

उत्तर 👉 XXXII


प्रश्न  👉 M , C , L , D , X हे रोमन संख्याचिन्हे चढत्या क्रमाने लिहा.

उत्तर 👉 X , L , C , D , M 


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🧐 तुम्हाला जर एक ते शंभर रोमन संख्यांचे वाचन करायचे असेल तर खालील व्हिडिओ पहा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🧐 तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्याचिन्हे या घटकाचा जर अभ्यास करायचा असेल तर खालील व्हिडिओ पहा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


✍️ तुम्हाला जर रोमन संख्या या घटकावरील सराव चाचणी सोडवायची असल्यास खालील बटनाला टच करा.