SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label लाला लजपतराय. Show all posts
Showing posts with label लाला लजपतराय. Show all posts

Tuesday, November 15, 2022

लाला लजपतराय मराठी माहिती

 ⚜️ लाला लजपतराय ⚜️


आज आपण लाला लजपतराय मराठी माहिती पाहणार आहोत. 

                       लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 साली धुडेकी पंजाब येथे झाला.लाला लजपतराय यांना 'पंजाबचा सिंह' म्हणून ओळखले जाते. यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराण नावाच्या गावी झाला. लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते. एक वेळा वाचन केलेले त्यांचे पाठांतर सहज होत होते. १८८१ साली त्यांनी मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण केली.

                 क्षक्षराधाकिशन आणि गुलाबदेवी हे त्यांचे आईवडील. त्यांचे सुसंस्कार बालपणापासूनच लाभले. १८८५ मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १८७७ मध्ये आर्य समाजाचे दयानंद सरस्वती पंजाबात आले होते. त्यांचे प्रभावशाली भाषण ऐकून लालाजींच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्यांना दयानंद सरस्वतीचे सर्व विचार पटले आणि ते त्यांचे अनुयायी झाले.

                लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज उभारण्याचे ठरले, त्या वेळी लालाजींनी अथक प्रयत्न करून | पाच लाख रुपये जमविले आणि कॉलेजची उभारणी केली. त्याच कॉलेजमध्ये ते इतिहास हा विषय शिकवत होते. समाजातील दुःख ते पहात होते. त्यामुळे आपण सेवेसाठी पुढे आले पाहिजे, हे त्यांनी जाणले. अनाथ मुलांचे ते पालन करत होते. विधवा स्त्रियांना खंबीरपणे जीवन जगण्याचा मार्ग दाखवीत होते. कोठे भूकंप जरी झाला, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, तरी त्या ठिकाणी जाऊन ते सेवा करीत असत. हळूहळू ते भारतातील दुःखी-कष्टी लोकांशी एकरूप होऊ लागले.

                   १८९७ साली मध्यप्रदेशात दुष्काळ पडला. सतत तीन वर्षे दुष्काळ होता. त्या वेळी आर्य समाजाचा कार्यकर्ता या नात्याने लालाजींनी सेवाकार्य सुरू केले. स्वतः अपार कष्ट करून समाजाला सावरण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाच्या वेळी ख्रिस्ती मिशनरी भारतातील गरीब लोकांना मदतीचे आश्वासन देऊन हिंदूचे धर्मांतर करीत असत. लालाजी वकील होते. त्यांनी हे कारस्थान जाणले आणि कायदयाच्या आधारे धर्मातरावर बंदी आणली.

                    लालाजींनी जहालमतवादी असलेल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे भाषण ऐकले, सुरेंद्रनाथांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल जी मते भाषणातून मांडली, त्याचा प्रभाव लालाजींवर पडला. १८ व्या शतकात इटलीत जोसेफ मॅझिनी यांनी जे कार्य केले त्याचाही प्रभाव लालाजींवर पडलेला होता. आपला राजकीय गुरू म्हणून जोसेफ मॅझिनींना मानून लालाजींनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाला चालना देण्याच्या कार्याला लालाजींनी प्राथमिकता दिली. राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांची भाषणे होऊ लागली. संपूर्ण हिंदुस्थानात ब्रिटिश्यांच्या विरोधात जनमत संघटित करण्यावर लालाजींनी भर दिला.

                     १९०५ साली काँग्रेसने त्यांना भारतीयांच्या मागण्यांसाठी ब्रिटिश सरकारच्या अत्याचाराच्या वर्णनासाठी इंग्लंडला पाठविले. त्या वेळी त्यांना खर्चासाठी ३००० हजार रुपये दिले; परंतु त्यांनी ते आर्य समाजाला दिले आणि स्वत:च्या खर्चाने इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी आपली बाजू ठामपणे मांडली. याच वर्षी लॉई कर्झनने बंगालची फाळणी केली; परंतु बिपीनचंद्र पाल, लोकमान्य टिळक व लालाजींनी एकत्र येऊन बंगालची फाळणी रद्द करून टाकली.

                         पंजाबमधील शेतकऱ्यांना सरकारविरुद्ध चेतावणी देतात, या आरोपाखाली लालाजींना सहा महिने ब्रिटिशांनी मंडाले कारागृहात पाठविले. मंडालेच्या तुरुंगात राहून ते देशाच्या स्वातंत्र्याचे चिंतन करत होते. तुरुंगातून सुटल्यावर ते लाहोरला परत आले. सरकारी हेर आपल्यामागे आहेत याची माहिती होताच ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतील भारतीयांना स्वातंत्र्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र काढले. त्यातून ते भारतीय स्वातंत्र्याचे विचार सातत्याने मांडत होते.

                       अमेरिकेतून आठ वर्षांनी ते परत आले. १९२० मध्ये भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. असहकार करण्याचा ठराव या सभेत मंजूर झाला. पुन: कारावास झाला. पुनः ते मोतीलाल नेहरू व चित्तरंजनदास यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षात सामील झाले. पुढे मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून आले व त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.

                     आर्य समाजामुळे हिंदूंबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदर होता. त्यांनी श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. 'अनहॅपी इंडिया, दि व्हाईस ऑफ टूथ, दि एसेम ऑफ दि ईस्ट' इत्यादि ग्रंथ लिहिले. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी 'सायमन कमिशन' लाहोरला भेटीसाठी आले होते. त्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे घेऊन लालाजींनी पुढाकार घेतला. त्या वेळी त्यांना जबरदस्त लाठीमार बसला आणि त्यातच हा पंजाबचा सिंह अनंतात विलीन पावले. त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 1928 ला झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

लाला लजपत राय यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे मुद्द

⚜️ जन्म 28 जानेवारी 1865 धुडेकी, पंजाब

⚜️ 1880 ला कलकत्ता व पंजाब विद्यापिठाची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाले.

⚜️ 1886 ला कायदयाची पदवी मिळविली.

⚜️ आर्य समाजाच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या सोळाव्या वर्षी आर्य समाजाचे सदस्य बनले.

⚜️ त्यांनी लाला हंसराज यांना 1886 ला लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज काढण्यासाठी मदत केली.

⚜️ लालाजी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजचे सचिव बनले. 

⚜️ त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. (पंजाबचा सिंह)

⚜️ हिंदू महासभा, आर्य समाज, राष्ट्रीय काँग्रेस या संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. 

⚜️ लाल-बाल-पाल पैकी लाल म्हणजेच लाला लजपतराय होय.

⚜️ द पंजाब नावाचे वृत्तपत्र ते चालवित.

⚜️ भारतीय स्वातंत्र्यासाठी अमेरिकेत जाऊन त्यांनी इंडियन होमरुल लीगची स्थापना न्यूयॉर्क येथे केली. तेथेच त्यांनी यंग इंडिया हे मासिक सुरू केले. 

⚜️ 1920 च्या कलकत्ता काँग्रेस खास अधिवेशनाचे अध्यक्ष होते...

⚜️ 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला. त्याबाबत तुरुंगवासही झाला.

⚜️ लालाजींनी लाहोर येथे टिळक स्कुल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना केली. समाजसेवेसाठी लोकसेवक संघ काढला. 

⚜️ 1925 च्या कलकत्ता येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.

⚜️ 1927 ला सायमन कमिशनला विरोध केला. बहिष्कार टाकला. याबाबत लाहोर येथे मोर्चा काढला. यावेळी ब्रिटीश पोलीसां लालाजींवर लाठीहल्ला केला. त्यांत जखमी झाल्यामुळे पुढे दोन आठवड्यांनी 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले. 

⚜️ लेखन - अनहॅपी इंडिया, आर्य समाज, यंग इंडिया, इंग्लंडस डेल्ट टु इंडिया, अवर एज्युकेशनल प्रॉब्लेम, द मॅसेज ऑफ द भगवद्गीता, छत्रपती शिवाजी, योगीराज श्रीकृष्ण इ. 

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️