SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label शाब्दिक उदाहरणे. Show all posts
Showing posts with label शाब्दिक उदाहरणे. Show all posts

Monday, September 12, 2022

शाब्दिक उदाहरणे ~ वजाबाकी

⚜️  शाब्दिक उदाहरणे ~ वजाबाकी⚜️



1} प्रतीक्षाकडे 870 रुपये होत. त्यापैकी तिने 462 रुपयांची पुस्तके घेतली. तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


2} एका बागेत 762 रोपे होती. त्यापैकी 575 रोपांना पाणी घातले, तर किती रोपांना पाणी घालायचे राहिले?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


3} विक्रम कडे 940 बिया जमा केल्या. त्यापैकी 560 बिया सिताफळाच्या होत्या व उरलेल्या बिया जांभळाच्या होत्या, तर जांभळाच्या बिया किती होत्या?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


4} एका शाळेत 590 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 365 मुली आहेत, तर त्या शाळेत मुले किती आहेत?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


5} सुभाषरावांनी वाढदिवसासाठी 396 वह्या आणल्या. त्यापैकी 245 वह्या विद्यार्थ्यांना वाटप केल्या, तर त्यांच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या असतील?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


6} एका शेतकऱ्याकडे 543 जनावरे होती. त्यापैकी एका गोठ्यात 292 जनावरे आहेत, तर दुसऱ्या गोठ्यात किती जनावरे असतील?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


7} ओंड गावची लोकसंख्या 846 आहे. यापैकी 457 पुरुष आहेत तर स्त्रिया किती असतील?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


8} श्यामरावांनी 480 गणपतीच्या मूर्ती तयार केल्या. त्यापैकी 365 मूर्ती विकल्या, तर श्यामरावांकडे किती मूर्ती शिल्लक राहिल्या?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


9} अथर्वच्या वाढदिवसाला डेकोरेशन साठी 700 फुगे आणले होते. त्यापैकी 240 फुगे मुलांनी फोडले, तर किती फुगे शिल्लक राहिले?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


10} सुरज 452 गोट्यांपैकी 136 गोट्या तो खेळामध्ये हरला, तर त्याच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिले असतील?

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

हातच्याची वजाबाकी कशी करावी याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली टच करा.

          👇



Saturday, September 10, 2022

गणित शाब्दिक उदाहरणे

⚜️ शाब्दिक उदाहरणे ⚜️



1} शाळेच्या ग्रंथालयाला मालतीबाईंनी 450 पुस्तके व वसंतरावांनी 325 पुस्तके दिली, तर एकूण किती पुस्तके ग्रंथालयाला भेट मिळाली?

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


2} टेकडीवर 240 गुलमोहराची व 475 कडूलिंबाची झाडे लावली तर, एकूण किती झाडे लावली?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


3} ग्रामस्वच्छता अभियानात 465 स्त्रिया व 376 पुरुष सहभागी होते, तर एकूण किती व्यक्ती सहभागी झाले?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


4} प्रदूषण चाचणी केंद्रावर 295 दुचाकी वाहनांची व 417 चार चाकी वाहनांची प्रदूषण चाचणी केली, तर एकूण किती वाहनांची प्रदूषण चाचणी केली?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


5} एका वृक्षदिंडीत 559 मुलगे व 376 मुली सहभागी झाल्या तर, एकूण किती मुले वृक्षदिंडीत सहभागी झाली?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


6}  कविताकडे 798 गोष्टीची पुस्तके व 348 कवितेची पुस्तके होती, तर एकूण किती पुस्तके तिच्याकडे होती?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


7}  रामरावांच्या गोठ्यात 546 गायी होत्या काही दिवसांनी त्यांनी 208 गाई विकत घेतल्या, तर एकूण किती गाई झाल्या?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


8} सविताने एका दुकानातून 275 रुपयांचा एक फ्रॉक आणि 399 चा एक शर्ट विकत घेतला, तर तिची एकूण खरेदी किती रुपयांची झाली?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


9}  धान्य दुकानात 432 पोती गव्हाची आणि 568 पोती तांदळाची होती, तर एकूण किती पोती धान्य दुकानात होते?


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


10} अविनाश जवळ 485 रुपये होते. त्याला मामांनी 365 रुपये दिले, तर अविनाश जवळ किती रुपये झाले?


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


बेरीज या घटकाची चाचणी सोडवण्यासाठी खाली टच करा.