शाब्दिक~ उदाहरणे बेरीज
इयत्ता पहिली
1} सागर कडे २ गोट्या आहेत. सुरज कडे ४ गोट्या आहेत, तर दोघांच्या मिळून किती गोट्या होतील?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
2} आरतीकडे ५ लाडू आहेत. तिला राजने ३ लाडू दिले, तर आरतीकडे किती लाडू होतील?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
3}अनुजाकडे ४ गुलाब व २ झेंडूची फुले आहेत, तर अनुजाकडे एकूण किती फुले आहेत?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
4} परीकडे ६ लाल मनी व २ निळे मनी आहेत, तर परीकडे सगळे मिळून किती मणी आहेत?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
5} राणीने ३ पाने वाचली व प्रतिक ने ४ पाने वाचली तर, दोघांनी मिळून किती पाने वाचली ?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
6} रामने २ चॉकलेट प्रेमला दिले व ३ चॉकलेट राजला दिले, तर रामने एकूण किती चॉकलेट वाटले?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
7} अब्दुलकडे ३ वह्या व ५ पुस्तके आहेत, तर अब्दुल कडे वह्या व पुस्तके मिळून किती आहेत?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
8} आंब्याच्या झाडावर ३ पक्षी होते. आणखीन ४ पक्षी येऊन बसले, तर आंब्याच्या झाडावर एकूण किती पक्षी झाले?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
9} एका परातीत ४ सफरचंद होते. आईने आणखीन त्यात ४ सफरचंद ठेवले, तर एकूण परातीत किती सफरचंद झाले?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
10} श्यामने ५ रुपयांचा पेन व ३ रुपयाची सिस्पेन्सिल विकत घेतली, तर श्यामने किती रुपयांची खरेदी केली?
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
इयत्ता तिसरी व चौथीसाठी शाब्दिक उदाहरणे सोडवायचे असतील तर खाली टच करा.
👇
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी बेरीज कशी करावी याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली टच करा
👇