SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label शालेय पोषण आहार. Show all posts
Showing posts with label शालेय पोषण आहार. Show all posts

Saturday, September 21, 2024

पीएम पोषण आहार योजना

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीची नोंद १०० टक्के करणे बाबत...

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना


विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीची नोंद १०० टक्के करणे बाबत...

                 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती सर्व जिल्हयातील शाळांनी सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. याकरीता योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांचा समावेश एमडीएम पोर्टलवर असणे व सर्व शाळांनी १०० टक्के उपस्थितीची नोंद करणे अनिवार्य आहे.

                       माहे एप्रिल, २०२४ पासून संचालनालयामार्फत वेळोवेळी आवश्यक लेखी निर्देश देऊन तसेच ऑनलाईन बैठकांमध्ये जिल्हयातील योजनेस सर्व पात्र शाळांनी एम. डी.एम पोर्टलवर १००% दैनदिन उपस्थिती माहिती नोंदविणे आवश्यक असूनदेखील अद्यापही काही जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांनी समाधानकारक प्रगती केलेली दिसून येत नाही. राज्याची दैनंदिन माहिती केंद्रशासनाच्या https://pmposhan- ams.education.gov.in या संकेतस्थळावर १०० % नोंदविली जात नसल्यामुळे केंद्रशासनाने राज्यास सन २०२४-२५ करीता मंजूर करण्यात आलेल्या केंद्र हिस्स्याचा अद्यापही वितरीत केलेला नाही, यामुळे पुढील कालावधीमध्ये योजनेच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी नाराजी व्यक्त करुन याकरीता जबाबदार सर्व संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

                  माहे एप्रिल, २०२४ पासून ऑनलाईन उपस्थितीबाबत सर्व जिल्हयांकडे पाठपुरवठा करण्यात येत आहे. तसेच वेळावेळी संचालनालयाकडून घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकांमध्ये अनेक जिल्ह्यांनी विविध कारणांमुळे स्थानिक पातळीवर, जिल्हास्तरावर शाळांनी सुट्टी घेतली असल्यामुळे AMS प्रमाण कमी असल्याचे कारण नमूद करण्यात येत आहे.

                        त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यांमध्ये मा.विभागीय आयुक्त/मा. जिल्हाधिकारी/मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळांना कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या जाहिर केल्या असल्यास अशा प्रकारच्या सुट्ट्यांबाबत संचालनालयास लेखी स्वरुपात शाळांच्या संखेसह पूर्वसूचना देण्यात यावी तसेच स्थानिक पातळीवर कोणत्याही शाळेने अशा प्रकारची सुट्टी घेण्याचे निश्चित केले असल्यास अशा शाळांच्या संखेसह संचालनालयास लेखी स्वरुपात पूर्वसुचना देणे आवश्यक आहे, याची सर्व शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. यापुढील कालावधीमध्ये सर्व शाळांकडून एमडीएम पोर्टलवर १०० % टक्के उपस्थितीची नोंद करणेबाबतची जबाबदारी संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात येत आहे.

                    उक्त निर्देशाप्रमाणे सर्व जिल्ह्यांनी आवश्यक कार्यवाही व उचित सनियंत्रण करावे, यानंतर कोणत्याही जिल्ह्यांकडून उशीराने शाळांना सुट्टी असलेबाबतचे कारण स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांच्या उपस्थितीची नियमितपणे १०० टक्के नोंद न झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे जबाबदार राहतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.



Wednesday, April 24, 2024

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात..

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात..


विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात..


संदर्भ :- डॉ. सबा अख्तर, एनआयसी दिल्ली यांचेकडील संदेश दि. २३.०४.२०२४.

          प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.

1. pmposhan-mis.education.gov.in

२. education.maharashtra.gov.in

उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.

अ. Annual Data Entry

आ. Monthly Data Entry

इ. MDM daily attendance

सन २०२४-२५ वा आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम. आय. एस पोर्टलवर Annual Data Entry

बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचूकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करावयाचा आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा संबंधित महिन्याच्या पुढील महिन्यातील दि. ०५ पर्यंत अद्यावत करावयाचा आहे. माहे एप्रिल, २०२४ करीताचा मंथली एमआयएस डाटा दि. ०५.०५.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्यात यावा, तद्नंतर सदरची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याबाबत केंद्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. 

       सबब सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी पीएमपोषण यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry monthly mis data entry त्वरीत पूर्ण करुन घ्यावी व विहित दिनांकाच्या आत सर्व ऑनलाईन कामकाज पूर्ण होईल याकरीता आवश्यक ते निर्देश सर्व तालुक्यांना निर्गमित करणेत यावेत तसेच प्रस्तुत बाबत उचित सनियंत्रण करुन विहित कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करुन घ्यावे.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सतत सदर जीआरची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना वार्षिक फॉर्म 2024-2025 DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Tuesday, April 23, 2024

राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

 राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजना


विषयः- राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.

            राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.

        संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाचे PDF DOWNLOAD करायचे असेल तर खालील क्षेत्राला टच करा.



Friday, April 19, 2024

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

शालेय पोषण आहार.

विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

संदर्भ- १. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.४. दि.११/०४/२०२४.

२. शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा-राजे-०/उन्हाळी सुट्टी एस-१/२२०६, दिनांक १८/०४/२०२

३. शिक्षण संचालनालयाचे पत्र क. प्रावि-३०१/२०२४/३१८४, दिनांक ११/०४/२०२४.

शाळेतून सवलत देण्याबाबतचे पत्र ~ CLICK HERE

उपरोका संदर्भिय पत्रान्वये राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील माळामधील विद्याथ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भिय पत्र क्र. मधील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. संदर्भिय पत्र क. २ नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्याथ्यांना गुरुवार दिनांक ०२/०१/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिश्या स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात यावेत. थौजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाचे PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील बटनाला टच कर.