SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label संकलित मूल्यमापन दोन. Show all posts
Showing posts with label संकलित मूल्यमापन दोन. Show all posts

Wednesday, March 5, 2025

संकलित चाचणी 2 वेळापत्रक

 राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन / PAT चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करणेबाबत.

महोदय,

               राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गांच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वार्षाअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचाराधीन आहे.

                राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयाजन करण्यता येणार आहे. त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

           सन.२०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी- २ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT) आयोजनाबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे -देण्यात येत आहे.


सर्वसाधारण सूचनाः


१) संकलित मूल्यमापन- २ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरुन करण्यात येईल तथापि त्यांसाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा.

२) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत इयत्ता ३ री ते ९ वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन- २ च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत.

३) इयत्ता १ ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ री ते ९ वी अन्य विषयांच्या संकलित चाचणी-२/लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.

४) इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे.

५) वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे.

६) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी २ घ्यावयाची आहे. इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी- २ घेण्यात यावी.

७) तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधील तरतूदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यावयाची आहे. PAT-३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही.

टीप- इ. ५ वी व इ.८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

८) शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र / दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील. तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस हईल याची दक्षता घ्यावी.

९) तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

१०) संकलित चाचणी- २ च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.


११) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल.


१२) सदर सूचना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत.


संकलित बाचणी- २ आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांची असेल. त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.

वरीलप्रमाणे सूचना शाळा व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांचेसाठी निर्गमित करण्याबात कार्यवाहीसाठी आपले स्तरावरून आदेश व्हावेत ही विनंती.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा




Tuesday, March 26, 2024

संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना

 संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना

विषय: नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन बाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत....

संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक: आरटीई -२०२२/प्र.क्र.२७६/एसडी.-१ दि. ०७.१२.२०२३

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT - संमू - २/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४

उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) - (संकलित

मूल्यमापन - २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)

२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका. उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.

 3. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्यचे नियोजन कळविण्यात आलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशीलपु ढीलप्रमाणे.


३. इयता ३ री. ४ थी, ६ वी व ७ ची या इयत्तांना प्रथग भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या

४. शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.

५ . संकलित मूल्यमापन -२ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

• इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः

२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसन्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.

४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित

मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT-३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील बटनाला टच कर