संचमान्यता २०२४-२५ बाबत..
![]() |
संच मान्यता |
उपरोक्त विषयी जिल्हा परिषद शाळेच्या सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी. संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालयास दिनांक २५.०२.२०२५ पुर्वी अवगत करावे. त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.
तसेच ज्या शाळेने दिनांक ३०.०९.२०२४ रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणाली मध्ये नोंदविले नाहीत व ज्या शाळेमधील एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याच प्रमाणे सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संचमान्यतेकरीता केंद्र प्रमुख/गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वर्कीग पोस्ट भरली आहे अशा शाळांच्या संचमान्यता झाल्या आहेत. तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदांची माहिती शाळास्तरावरुन अंतिम करावी.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा