सातारा प्रज्ञाशोध परीक्षा अंतरिम उत्तर सूची.
विषयः- इयत्ता 4 थी इयत्ता 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक २६/०३/२०२५ रोजीची अंतरिम उत्तरसूचीबाबत.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सातारा जिल्हा परिषद यांचे वतीने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इ. 4 थी व इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा ही दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती.
प्रज्ञाशोध परीक्षेची अंतरिम उत्तरसूची यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर उत्तरसूचीबाबत संबधित विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे. उत्तरसूचीबाबत काही आक्षेप असतील तर पुराव्यासह लेखी स्पष्टीकरण या कार्यालयातील प्रशा-20 श्री. राजेश जाधव यांचेकडे दिनांक 11/04/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत देण्यात यावेत. यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. सोबत इ. 4 थी व इ. 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा अंतरिम उत्तरसूची जोडण्यात आलेली आहे.
इयत्ता चौथी व सातवीची अंतरिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
इयत्ता चौथीच्या तीन प्रश्नांवर आपण आक्षेप घेऊ शकता.
पेपर ~ 1 (इयत्ता चौथी)
प्रश्न क्रमांक 47
पुढीलपैकी कोणत्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज सर्वाधिक आहे
1) 89. 2)18. 3)32. 4)47
उत्तर सूची मध्ये पर्याय क्रमांक 3 दिला आहे.
परंतु 89 च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 90 येते म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
पेपर 2 (इयत्ता चौथी)
प्रश्न क्रमांक 58
राम व श्याम यांच्यामध्ये दोन मुले आहेत तर राम व रमा यांच्यामध्ये दहा मुले आहेत
म्हणजे श्याम व रमा यांच्यामध्ये एकूण 13 मुले आहेत यात राम राम स्वतः देखील त्यांच्यामध्ये येतो.
याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 येतो.
प्रश्न क्रमांक 60
आकृतीत एकूण चौकोन किती आहेत
आकृतीत एकूण सहा चौकोन आहेत याचा पर्याय क्रमांक 1 येतो.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा