SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label हर घर तिरंगा. Show all posts
Showing posts with label हर घर तिरंगा. Show all posts

Thursday, August 8, 2024

हर घर तिरंगा

 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.

हर घर तिरंगा


संदर्भ -१. D.O. No. १७-३०/२०२४-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि. ०६/०८/२०२४

२. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. ०६/०८/२०२४

उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी👇


www.harghartiranga.com 


वेबसाईटवर अपलोड करावे, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन

व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.

तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील कलाक्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा. 

सोबत - संदर्भीय पत्र व मार्गदर्शक सूचना

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

हर घर तिरंगा सर्टिफिकेट मोबाईल वरून कसे डाऊनलोड करावे यासाठी खालील चित्राला टच करा.

घर घर तिरंगा सर्टिफिकेट


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सदर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

हर घर तिरंगा घोषणा मराठी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

हर घर तिरंगा घोषणा हिंदी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.