दि. १ मे, २०२५ महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत.
![]() |
1 मे 2025 बाबत |
शासन परिपत्रक
महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस समारंभ दि. १ मे, २०२५ रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे शासनाने ठरविले आहे. त्याप्रमाणे सर्व संबंधितांनी कार्यवाही करावीः-
अ) मुंबई, विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये, तहसिल मुख्यालये तसंच इतर सर्व ठिकाणी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात यावा, या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी इतर एखाद्या कार्यालयाने अथवा संस्थेने या दिवशी सकाळी ०७.१५ ते ०९.०० च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःया ध्वजवंदन समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी ०७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ०९.०० च्या नंतर आयोजित करावा.
ब) मुंबई, विभागीय मुख्यालये व जिल्हा मुख्यालये या ठिकाणी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाबरोबरच पोलीस. गृहरक्षक दले, नागरी संरक्षण दले, अग्निशामक दले इत्यादींचा समारंभीय संचलनाचा कार्यक्रम आयोजित करावा.
क) मुंबई तसेच विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी व इतरत्र शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी.
२. मा. राज्यपाल हे शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करतील.
३. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे पालकमंत्री/ मंत्री ध्वजवंदन करतील:-
४. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या इतर ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजवंदन करतील. तसेच तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी शासनाच्या शासन परिपत्रक क्रमांकः सीईआर-१०१५/९०१/३०, दिनांक २२ एप्रिल, २०१५ च्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार विधानसभा/विधानपरिषद सदस्य ध्वजवंदन करतील. ध्वजवंदन करणारे मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच तालुका मुख्यालयी तहसिलदार यांनी ध्वजवंदन करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी.
५. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व नेहमी संचलनात भाग घेणाऱ्या पथकांच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करुन मुंबई, विभागीय मुख्यालये व जिल्हा मुख्यालये येथे संयुक्त संचलनाची व्यवस्था करावी.
६. राष्ट्रध्वजाला वंदन करताना "राष्ट्रगीत" म्हणण्यात यावे/ वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन "राज्यगीत" वाजविण्यात यावे. ध्वजवंदन समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नाही.
७. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च. १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजवंदनाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.
८. घ्यावी. महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता
९. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तीनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.
१०. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील यांना सन्मानाने निमंत्रित करावे.
११. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.
१२. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/संदेश द्यावा, याप्रमाणे महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫