SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label PAT 3 ऑनलाइन प्रशिक्षण. Show all posts
Showing posts with label PAT 3 ऑनलाइन प्रशिक्षण. Show all posts

Thursday, April 18, 2024

PAT 3 ची माहिती भरताना वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय

 PAT 3 वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय.

PAT 3 ची माहिती भरताना अनेक समस्या वारंवार येतात या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे 

PAT - 3 माहिती भरताना वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

PAT 3 समस्या व उपाय


समस्या १ - Invalid U-DISE कोड

आपल्या शालार्थ पोर्टलवर शाळेचा UDISE कोड बरोबर असल्याची खात्री करा. चुकीचा UDISE कोड असल्यास मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी /DDO-२ यांनी approval घेण्यात यावे.

तरीही प्रश्न सुटत नसल्यास तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोडची पडताळणी करावी.


समस्या २ - Invalid मोबाईल क्रमांक

सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी/DDO-२ यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतिक्षा करा.


समस्या ३ - Invalid शालार्थ / शिक्षक आय.डी.

मुख्याध्यापक / DDO-१ यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून अचूक शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा.


समस्या ४ - शून्य शिक्षक असलेली शाळा

सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.


समस्या ५ - सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.

शालार्थ पोर्टल व UDISE प्लसवर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.


समस्या ६ मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत.

विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलवर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.


समस्या ७ शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी

सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.


समस्या ८ सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत ~

आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल. दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर त्या शाळेत ट्रान्स्फर करावी.


समस्या ९ - केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन

सध्या केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना सदर माहिती भरता येते. आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या शाळा, सराव पाठशाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, OBC कल्याण व मदरसा इ. शाळांना सध्या माहिती भरण्यास Access देण्यात आलेले नाहीत. याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

टीप : आपल्या शाळेतील कोणत्याही शिक्षकाचे लॉग इन होत असेल तर त्यांच्या लॉग इन वरून सर्व इयत्तांची माहिती भरावी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर प्रश्न उत्तर ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.


माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


Monday, April 15, 2024

PAT 3 ऑनलाइन प्रशिक्षण

 PAT 3 ऑनलाइन प्रशिक्षण

PAT संकलित चाचणी सत्र 2चे गुण (PAT महाराष्ट्र) ॲप 15 एप्रिल पासून नोंदविणे बाबत
 शिक्षक प्रशिक्षण
दि. 15 एप्रिल 2024
वेळ - 12:00 ते 01:00
You Tube प्रशिक्षण लिंक खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

PAT Bot तांत्रिक अडचणी Google Form भरण्यासाठी खालील चित्राला टच करा