SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, September 23, 2022

बोधकथा~ विद्येची किंमत

⚜️ विद्येची किंमत ⚜️



एकदा रामकृष्ण परमहंस शिष्यांसह गंगा स्नानासाठी गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध महापुरुष तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली. तसेच परत आले. व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले,' तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.

शिष्यांनी रामकृष्ण यांना सांगितले. रामकृष्ण म्हणाले त्यांना सांग, 'तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा सुद्धा नाही.' शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला. म्हणाला,' पुन्हा असे म्हणालात तर, तुम्हाला भस्म करून टाकीन.'

रामकृष्ण पुन्हा तसेच म्हटले. तेव्हा प्रत्यक्ष सिद्ध पुरुषाने त्यांना येऊन विचारले,' याचा अर्थ काय आहे?'

रामकृष्ण म्हणाले,' नावाडी सुद्धा दोन आण्यात पहिल्या तिराला घेऊन जातो. त्याचा इतरांना उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. ज्या विद्येचा लोकांना उपयोग नाही तिची किंमत शून्य आहे. म्हणून तुमच्या या विद्येची किंमत दोन आणे सुद्धा नाही.'

तात्पर्य

माणसाने आपल्या विद्येचा कर्तुत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा तरच त्या व्यक्तीला अर्थ प्राप्त होतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.